अतुल भोसलेंचा उमेदवारीचा अर्ज भरायले गेले, उदयनराजेंनी शरद पवार आणि रामराजेंना डिवचले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले कराड येथे आले होते.
सातारा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात हर्षवर्धन पाटील, समरजीत घाटगे, दीपक चव्हाण, रामराजे निंबाळकर यांच्या दोन्ही बंधूंनी शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली आहे. यावरच साताऱ्याचे खासदार, भाजप नेते उदयनराजे भोसले यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी शरद पवार आणि रामराजे निंबाळकर यांना लक्ष्य केले.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले कराड येथे आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
फोडाफोडीच्या राजकारणात शरद पवारांना नोबेल प्राईज दिले पाहिजे
महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात होत असून शरद पवारांच्या गटात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू आहे. एवढी फोडाफोडी झाली आहे की त्यावर मला काही विचारू नका. शरद पवारांना फोडाफोडीच्या राजकारणासाठी नोबेल प्राइज दिले पाहिजे, अशी खोचक टीका उदयनराजे यांनी केली.
advertisement
रामराजे नाईक- निंबाळकर फलटण पुरते मर्यादित, त्यांची साताऱ्यात ताकद नाही
तसेच महायुतीतून रामराजे नाईक- निंबाळकर बाहेर पडल्यामुळे काही फटका बसू शकतो का? यावर उदयनराजे भोसले यांनी खोचक टीका करत रामराजेंना मुजरा करतो. मात्र, रामराजे फलटण पुरते मर्यादित असून ते ना साताऱ्यात आहेत ना इथे ना तिथे... असे म्हटले.
कराडमधून भाजपकडून अतुल भोसले यांना उमेदवारी
view commentsभारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत कराडमधून डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून अद्यापपर्यंत उमेदवारांची घोषणा झालेली नाही. परंतु ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हेच कराडमधून रिंगणात असतील. गुरूवारी रात्री काँग्रेस पक्षाची यादी जाहीर होणार असल्याची माहिती कळते आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
October 24, 2024 4:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
अतुल भोसलेंचा उमेदवारीचा अर्ज भरायले गेले, उदयनराजेंनी शरद पवार आणि रामराजेंना डिवचले


