Shani Shingnapur : ऐन सुट्टीत शनी शिंगणापूरच्या कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप, कारण काय?
- Published by:Shreyas
Last Updated:
अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी येत्या 25 तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहेत, त्यामुळे नाताळच्या सुट्टीत शनीदेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
हरीष दिमोटे, प्रतिनिधी
अहमदनगर, 22 डिसेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी येत्या 25 तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहेत, त्यामुळे नाताळच्या सुट्टीत शनीदेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाने मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विधानसभेत झाल्यानंतर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अशातच आता विश्वस्त मंडाळाविरोध कर्मचारीही संपावर जाणार असल्याचं दिसतंय. शनी शिंगणापूर देवस्थानचे 400 कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या 25 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
advertisement
विश्वस्त मंडाळासोबत कर्मचारी संघटनेची बैठक पार पडली, मात्र यात कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्याने कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम असल्याच दिसतंय. नववर्षाचे स्वागत आणि नाताळच्या सुट्टीत लाखो भाविक शनीदेवाच्या चरणी नतमस्तक होत असतात. जर कर्मचारी संपावर गेले तर सुरक्षा, निवास , भोजन यासह इतर समस्यांना भक्तांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे देवस्थान प्रशासनाने कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची गरज आहे.
advertisement
काय आहेत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या?
-शैक्षणिक पात्रतेनुसार पदे दिली जावी.
-पाचव्या वेतन आयोगानुसार 2003 पासून फरक दिला जावा.
-सातवा वेतन आयोग लागू केला जावा.
-कुटुंबाला वैद्यकीय उपचार मोफत द्यावे.
-मृत कर्मचाऱ्याच्या घरातील एकाला नोकरी द्यावी.
Location :
First Published :
Dec 22, 2023 10:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shani Shingnapur : ऐन सुट्टीत शनी शिंगणापूरच्या कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप, कारण काय?







