Sharad Pawar Birthday : ''मंदिराच्या चाव्या पुजाराच्या हातात गेल्याने, विठ्ठलाचं...'', वाढदिवसाच्या बॅनरबाजीतून अजित पवारांना चिमटा

Last Updated:

Sharad Pawar Birthday Special: शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर "मंदिराच्या चाव्या पुजाराच्या हातात गेल्याने, विठ्ठलाचे महत्व कमी होत नाही" अशा आशयाचा मजकूर लिहण्यात आला आहे.

sharad pawar birthday banner
sharad pawar birthday banner
Sharad Pawar Birthday Special: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त शरद पवारांवर विविध क्षेत्रातून अनेक दिग्गज नेते,उद्योगपती अशी सगळी मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करतेय. यामध्ये सामान्य कार्यकर्ते देखील मागे राहिलेला नाहीये. बारामतीत शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरच्या माध्यमातून शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना चिमटा काढला आहे.त्यामुळे या बॅनरमध्ये नेमकं काय लिहलंय? हे जाणून घेऊयात.
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर "मंदिराच्या चाव्या पुजाराच्या हातात गेल्याने, विठ्ठलाचे महत्व कमी होत नाही" अशा आशयाचा मजकूर लिहण्यात आला आहे. या बॅनरच्या माध्यमातून शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना चिमटा काढला आहे.
खरं तर अजित पवारांनी अनेक आमदारांसह बंडखोरी करत राष्ट्रवादी दावा सांगितला होता. या दाव्यानंतर निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह बहाल करण्यात आलं होतं. तर शरद पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी हे चिन्ह देण्यात आलं होते. या पक्ष आणि चिन्हावर दोन्ही नेत्यांनी निवडणूक देखील लढवली होती. त्यामुळे विधानसभेत अजित पवारांनी 41 जागा जिंकल्या होत्या. तर शरद पवारांना अवघ्या 10 जागाच जिंकल्या होत्या.त्यामुळेच बॅनरवर "मंदिराच्या चाव्या पुजाराच्या हातात गेल्याने, विठ्ठलाचे महत्व कमी होत नाही" असा मजकूर लिहत अजित पवारांना डिवचलं आहे.
advertisement
दरम्यान आज शरद पवारांचा वाढदिवस असल्या कारणाने अजित पवार यांनी त्यांना एक्सवरून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यासोबत दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवार आणि त्यांच्या आमदार खासदारांनी त्यांची भेट त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

भेटीनंतर अजित पवार काय म्हणाले?

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आज शरद पवारांचा वाढदिवस आहे, उद्या प्रतिभा काकींचा वाढदिवस आहे. आजचं दोघांना भेटलो, त्यांचे दर्शन घेत आशिर्वाद घेतला असल्याचे अजित पवारांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले, शरद पवारांसोबत राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाली. परभणीमधील हिंसाचाराच्या घटनेची त्यांनी माहिती घेतली. त्याशिवाय संसदेचे हिवाळी अधिवेशन आणि राज्यातील इतर राजकीय घडामोडींबाबत चर्चा झाली असल्याचेही अजित पवारांनी सांगितले. मी कुटुंबातील सदस्य आहे, मी बाहेरचा कोणीच नाही, असेही अजित पवारांनी सांगितले. आजची भेट ही कौटुंबिक असल्याचाही निर्वाळा त्यांनी दिला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar Birthday : ''मंदिराच्या चाव्या पुजाराच्या हातात गेल्याने, विठ्ठलाचं...'', वाढदिवसाच्या बॅनरबाजीतून अजित पवारांना चिमटा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement