'त्यांच्या' कुणी नादाला लागेल असं वाटत नाही, CM पदावरून शरद पवार यांची लक्षवेधी कमेंट

Last Updated:

महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून अंतर्गत कुरबुरी सुरू असून त्यांच्यात संघर्ष होईल का? असा प्रश्न शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारला.

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस
मुंबई : महायुती सरकारने अडीच वर्षात केलेले काम, निवडणुकीच्या तोंडावर आणलेली लाडकी बहीण योजना, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है अशा घोषणांनी केलेले धार्मिक ध्रुवीकरण अशा सगळ्याचा फायदा निवडणुकीत महायुतीला झाला आणि पुन्हा एकदा राज्यात युतीचे सरकार आले. भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त म्हणजे १३२ जागा मिळाल्या. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षालाही घवघवीत यश मिळाले. महाराष्ट्र विधानसभेचे निकाल पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरून गुगली टाकली. मुख्यमंत्रिपदावर आमचे काहीही ठरले नाही, ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असे काहीही सूत्र ठरलेले नाही, असे सांगत मुख्यमंत्रिपदावर आपला अप्रत्यक्ष दावा त्यांनी सांगितला.
महायुती बहुमताने सत्तेत आल्यानंतर आता महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे दिल्या जाणार? राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अशा चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत. दुसरीकडे निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या आघाडीत एकदम शांतता आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन निकालावरील मौन सोडलं. यावेळी त्यांना महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून अंतर्गत कुरबुरी सुरू असून त्यांच्यात संघर्ष होईल का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.
advertisement
त्यावर बोलताना शरद पवार यांनी त्यांच्या खास स्टाईलने उत्तर दिले. एकट्या भारतीय जनता पक्षाच्या १३३ जागा निवडून आल्या आहेत. त्यांना एवढे बहुमत मिळाले आहे की त्यांच्या कुणी नादी लागेल, असे मला वाटत नाही, असे हसत हसत पवार मिश्किलपणे म्हणाले. एकप्रकारे १३३ जागा आलेल्या भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असेच त्यांनी सुचवले. मुख्यमंत्रिपदाची मागणी करणारे भाजपचे सहयोगी पक्ष शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना सबुरीने घेण्याचा अप्रत्यक्षन सल्ला पवार यांनी दिला.
advertisement
मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे यांची गुगली
महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? भाजपकडून मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला जातोय, असे विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले, ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असे काहीही आमचे समीकरण ठरलेले नाही. मुख्यमंत्रिपदावर आमचे निवडणुकीआधी काहीही ठरले नव्हते, असे सांगत शिंदे यांनी एकप्रकारे गुगली टाकल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीमधल्या मुख्यमंत्रिपदावरून अंतर्गत युद्धाला सुरुवात झाल्याचे बोलले जाते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'त्यांच्या' कुणी नादाला लागेल असं वाटत नाही, CM पदावरून शरद पवार यांची लक्षवेधी कमेंट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement