Sharad Pawar : पंतप्रधान मोदींना माझं आवाहन, त्यांनी..., शरद पवारांची जळगावमधून थेट मागणी
- Published by:Shreyas
Last Updated:
शरद पवार यांनी अनिल पाटील यांच्या जळगाव मतदारसंघात सभा घेतली, या सभेतून शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेत भाजपवर टीका केली आहे.
जळगाव, 5 सप्टेंबर : राष्ट्रवादीमध्ये घडलेल्या सत्तानाट्यानंतर शरद पवार अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये सभा घेत आहेत. छगन भुजबळांचा येवला, धनंजय मुंडेंच्या बीड, हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूरनंतर शरद पवारांनी अनिल पाटील यांच्या जळगावमध्ये सभा घेतली. या सभेमधून त्यांनी केंद्रातल्या भाजप सरकारवर टीका केली.
आज चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता गेली आहे. सर्वसामान्य माणसं, तरुणांना रोजगार नाही. यवतमाळ जिल्ह्यात 15 दिवसांमध्ये 20 लोकांनी आत्महत्या केल्या. शेतकरी हा घाम गाळणार आहे, त्याच्यावर जर आत्महत्याची वेळ येत आहे, त्याच्यासाठी पाठीशी उभं राहण्यासाठी शक्ती उभी केली पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
भाजपने सत्तेचा गैरवापर केला आहे. देशाचे पंतप्रधान भोपळला गेले होते. त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही जे आरोप केले आहे., त्याची चौकशी करा, जर खोटे असेल तर तुम्ही काय शिक्षा देणार ते देशाला सांगा. ही गोष्ट आपल्या हिताची नाही, अशी टीकाही शरद पवारांनी केली.
advertisement
जयंत पाटील आणि आम्ही जालन्याला गेलो होतो. तिथे एका शेतकऱ्याने उपोषण केलं. पण काही कारण नसताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले. राज्यात अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटत आहे. लोकांवर लाठीहल्ला केला. शेतकऱ्यांवर शेत मजुरांवर लाठीहल्ला करण्याची नियत ज्यांची असेल त्याच्या हाती सत्ता राहणार नाही, सर्वांनी एकत्र येऊन त्यांना दूर करण्याचा निर्णय घेतला पाहिजे, त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे, असंही शरद पवारांनी सांगितलं.
advertisement
'ही स्थिती बदलायची आहे, वेळ लागेल पण खात्री आहे स्थिती बदलेल. शेतकरी काही मागत नाही, तो मालाची किंमत मागतोय, त्यासाठी तो संघर्ष करू शकतो. सत्तेचा गैरवापर शेतकरी, मजूर आणि आई-बहिणीवर केला जात आहे. 100 टक्के बदल करायचा आहे, त्यात तुम्ही साथ द्यायला हवी,' असं आवाहन शरद पवारांनी जळगावच्या स्वाभीमान सभेतून केलं.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Sep 05, 2023 5:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar : पंतप्रधान मोदींना माझं आवाहन, त्यांनी..., शरद पवारांची जळगावमधून थेट मागणी







