Sharad Pawar NCP : एक वर्षात दोनदा पक्षांतर! पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, पुणे ग्रामीणचा बडा नेता शिंदे गटात करणार प्रवेश

Last Updated:

Maharashtra Local Body Election : नगर परिषद, नगर पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय उलथापालथींना वेग येऊ लागला आहे.

एक वर्षात दोनदा पक्षांतर! पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, पुणे ग्रामीणचा बडा नेता शिंदे गटात करणार प्रवेश
एक वर्षात दोनदा पक्षांतर! पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, पुणे ग्रामीणचा बडा नेता शिंदे गटात करणार प्रवेश
सचिन तोडकर, प्रतिनिधी, पुणे: नगर परिषद, नगर पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय उलथापालथींना वेग येऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पुणे ग्रामीणमध्ये धक्का बसला आहे. खेड तालुक्यातील राजकीय समीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे अतुल देशमुख हे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
खेड तालुक्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल घडवून आणत माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज चाकण येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अतुल देशमुख अधिकृतरीत्या शिवसेना शिंदे गटा मध्ये प्रवेश करणार आहेत. एक वर्षभरापूर्वी देशमुख यांनी भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
advertisement
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे खेड तालुक्यातील ताकदवान पदाधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नेत्याच्या हालचालींवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. वर्षभरातच भाजपपासून दुरावत राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेल्या देशमुखांनी आता धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक पातळीवरील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या काळात उमेदवारी नाकारल्याने देशमुख नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर स्थानिक स्तरावर नेतृत्वात झालेली दुफळी आणि अंतर्गत मतभेद यामुळे त्यांनी शरद पवारांचा पक्ष सोडल्याची चर्चा आहे.
advertisement
देशमुख यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला खेड तालुक्यात मजबूत आधार मिळणार आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता देशमुखांच्या प्रवेशानंतर आगामी निवडणुकांमध्ये तालुक्यातील शक्तिसमीकरण कसे बदलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खेड तालुक्यावर मजबूत पकड असलेल्या नेत्यांपैकी एक आहे. स्थानिक पातळीवर त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. पक्षांतर्गत मतभेद आणि स्थानिक राजकीय समीकरणांमुळे त्यांनी एका वर्षानंतर शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar NCP : एक वर्षात दोनदा पक्षांतर! पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, पुणे ग्रामीणचा बडा नेता शिंदे गटात करणार प्रवेश
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement