शरद पवारांच्या मनातलं अखेर ओठांवर? लेकीसाठी फिल्डिंग, जयंत पाटलांना 'गुगली'? दादा ताईच निर्णय घेणार
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sharad Pawar On Party reuniting : राष्ट्रवादीतील दोन्ही गट आता पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा होत असताना आता शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Sharad Pawar On Supriya Sule : राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील मोदीबाग इथं पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं. सगळ्यांची विचारधारा एक आहे त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको, असं शरद पवार यांनी वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शिंदेसोबत गेले ते पुन्हा आमच्यासोबत आले तर आश्चर्य वाटायला नको. याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे. त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे, असं शरद पवार म्हणाले. तर काही आमदार अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्याबाबतचा निर्णय हा जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंनी घ्यावा, असंही शरद पवार म्हणालेत.
advertisement
जयंत पाटलांना डच्चू?
शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना फटका बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यावर समसमान जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र आता अंतिम निर्णय सुप्रिया सुळे घेतील, असं शरद पवार म्हणाले आहेत. तसेच आमदारांचा निर्णय जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे घेतील, असंही शरद पवार यांनी ऑफ द रेकॉर्ड बोलताना म्हटलं.
advertisement
सुप्रिया सुळेंनी निर्णय घ्यावा - शरद पवार
शरद पवार पक्षामध्ये पक्षांतर्गत दोन मतप्रवाह असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. आमच्यातील एका गटाला आम्ही अजित पवार यांच्या सोबत जावं, असं वाटत असल्याचं शरद पवार यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. संसदेत विरोधी पक्षात बसायचे की सत्ताधारी पक्षात बसायचं? याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे, असं शरद पवार म्हणाले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 08, 2025 1:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवारांच्या मनातलं अखेर ओठांवर? लेकीसाठी फिल्डिंग, जयंत पाटलांना 'गुगली'? दादा ताईच निर्णय घेणार