Sharad Pawar : जिहादवरून शरद पवारांची फडणवीसांवर टीका, म्हणाले, हा शब्द...

Last Updated:

साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी वोट जिहादचा आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

शरद पवार
शरद पवार
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी वोट जिहादचा आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना म्हटलं की, या निवडणुकीत सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी लोकसभेची निवडणूक गेल्यामुळे यावेळी विधानसभा गांभीर्याने घेतली आहे.
वोट जिहादच्या मुद्द्यावरून शरद पवार म्हणाले की, जिहाद हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे. इतरांनी कधीही काढलेला नाही. यामुळे महाविकास आघाडीला मतदान झाले. एखादा विशिष्ट समाज किंवा हिंदू समाज जर एखाद्या शहरात जास्त प्रमाणात असेल आणि त्याने भाजपला मतदान केलं म्हणजे इथं जिहादचा परिणाम असं होत नाही. यामुळे लव जिहाद हा शब्द प्रयोग करून देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक प्रकारे राजकीय कलह तयार केला आहे.
advertisement
लोकांनी बारामती मध्ये लोकसभेला गंमत केली. त्यांचा तो अधिकार आहे माझा नाही. लोकांनी तुम्हाला बारामतीचा वाली म्हटलं पाहिजे. मी म्हणून काय उपयोग असंही शरद पवार म्हणाले.  बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला जातो कारण त्यांना निवडणुकीची खात्री नाही. हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये चांगले वातावरण असताना ते खराब वातावरण करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोपही शरद पवारांनी केला.
advertisement
दोन कोटीहून अधिक महिलांना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे याचा परिणाम होईल. तरीदेखील महिलांमधील 67 हजार अत्याचाराच्या घटना आहेत. यामध्ये बेपत्ता होण्याचे प्रमाणही 64 हजार महिला आणि मुली बेपत्ता आहे. राज्यात लोकांना परिवर्तन हवंय आणि यावेळी परिवर्तन होईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar : जिहादवरून शरद पवारांची फडणवीसांवर टीका, म्हणाले, हा शब्द...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement