पुण्यात शाळकरी पोरांची WWE मॅच, भररस्त्यात फ्रीस्टाईल हाणामारी, घटनेचा VIDEO व्हायरल

Last Updated:

शिरूरमध्ये शाळकरी मुलांची फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. दोन गटांनी एकमेकांना मारहाण केली आहे.

News18
News18
सचिन तोडकर, प्रतिनिधी शिरूर: काही दिवसांपूर्वी पुण्याच्या राजगुरूनगर परिसरात एका विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ट्यूशनमध्ये बेंचवर बसण्यावरून झालेल्या वादातून वर्गमित्रानेच ही हत्या केली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर शाळकरी मुलांमधील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ही घटना ताजी असताना आता शिरूरमध्ये शाळकरी मुलांची फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.
पुणे जिल्ह्याच्या शिरुर शहरात काही शाळकरी मुलांमध्ये हा तुफान राडा झाला. शाळकरी मुलांचे दोन गट आपसात वाद घालताना आणि एकमेकांना मारताना दिसत आहे. या घटनेचा १५ सेकंदाचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाळकरी विद्यार्थी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. ही घटना शिरूर शहरातील BJ कॉर्नर चौक परिसरात घडली.
advertisement
शिरुर शहरातील गजबजलेल्या BJ कॉर्नर चौकात शाळकरी मुलांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भर रस्त्यात, नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या प्रकारामुळे शहरातील कायदा–सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये शाळेचे गणवेश घातलेले काही विद्यार्थी एकमेकांना मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहेत. काहीजण लाथा बुक्क्यांचा मारा करत असल्याचं देखील दिसत आहे.
advertisement
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची दखल शिरुर पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केलाय. मात्र पोलिसांकडून संबंधित शाळांवर आणि विद्यार्थ्यांवर कोणती कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. यापूर्वीच शिरूरपासून काही अंतरावर असलेल्या राजगुरूनगरमध्ये अशाच किरकोळ वादातून विद्यार्थ्याची हत्या झाली होती. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन काय पावलं उचलणार? हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यात शाळकरी पोरांची WWE मॅच, भररस्त्यात फ्रीस्टाईल हाणामारी, घटनेचा VIDEO व्हायरल
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement