शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला, संगमनेरचे वातावरण पुन्हा तापले

Last Updated:

Shiv Sena Mla Amol Khatal: आमदार अमोल खताळ हे संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमास गेले होते. खांडगाव येथील एकाने हात मिळवण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला केला.

अमोल खताळ (शिवसेना आमदार)
अमोल खताळ (शिवसेना आमदार)
हरीश दिमोटे, प्रतिनिधी, अहिल्यानगर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यातील संघर्षामुळे संगमनेरची चर्चा राज्यात होत असताना गुरुवारी संगमनेरमध्ये शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. संगमनेरमध्ये एका उद्घाटनाच्या निमित्ताने खताळ गेले असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे संगमनेरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

उद्घाटनच्या कार्यक्रमाला गेलेले असताना अमोल खताळ यांच्यावर हल्ला

आमदार अमोल खताळ हे संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमास गेले होते. खांडगाव येथील एकाने हात मिळवण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला केला. मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले आहे.

खताळ समर्थकांचा समूह पोलीस ठाण्यात जमा व्हायला सुरुवात

अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्याची बातमी संगमनेरमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर खताळ समर्थक प्रचंड आक्रमक झाले असून आमदार समर्थकांचा प्रचंड मोठा समूह संगमनेर पोलीस ठाण्याच्या परिसरात जमा झाला आहे.
advertisement

संगमनेरचे वातावरण पुन्हा तापले

आमदार खातळ यांच्यावरील हल्ल्याची वार्ता समजताच शेकडो तरुणांची मालपाणी लॉन्स बाहेर गर्दी झाली. हल्ल्याच्या घटनेमुळे ऐन गणेशोत्सवात संगमनेरमधील राजकारण तापले आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमधील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

हिंदुत्व विरुद्ध धर्मनिरपेक्ष, संगमनेरची राज्यात चर्चा

संगमनेरचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि अमोल खताळ यांच्या समर्थकांमध्ये विविध कारणावरून कलगीतुरा रंगत आहे. विधानसभा निवडणूक निकालापासून या ना त्या कारणाने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने येत आहेत. हिंदुत्ववादी खताळ विरुद्ध धर्मनिरपेक्ष थोरात असे चित्र संगमनेरमध्ये आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पदाधिकारी अत्यंत आक्रमक होऊन एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
advertisement

कोण आहे अमोल खताळ?

-अमोल खताळ हे संगमनेरचे शिवसेना शिंदेसेनेचे आमदार आहेत
-नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला
-अमोल खताळ हे प्रखर हिंदुत्त्ववादी नेते म्हणून ओळखले जातात
-भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ताकद अमोल खताळ यांच्या मागे आहे
-अमोल खताळ आणि बाळासाहेब थोरात यांच्यात संघर्ष तीव्र
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला, संगमनेरचे वातावरण पुन्हा तापले
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement