BJP Shiv Sena Clash: भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले, बदलापूरमध्ये राडा, परिसरात तणाव
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Badlapur Shiv Sena Shinde BJP Clash : भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये अचानक जोरदार वाद झाला आणि काही वेळातच हा वाद वाढला आणि जोरदार राडा झाला.
बदलापूर : स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मतदानादिवशी बदलापूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. बदलापूर पश्चिमेतील गांधी नगर टेकडी परिसरातील एसटी बसस्टँड जवळ भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अचानक जोरदार वाद झाला आणि काही वेळातच हा वाद वाढला आणि जोरदार राडा झाला. निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप-शिंदे गटामध्ये तणावाची स्थिती दिसून आली होती.
बदलापूर नगर परिषदेसाठी आज मतदान पार पडत आहे . सहा जागांवरील मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने ४३ जागांवर इथे मतदान होत आहे. सकाळपासून मतदार राजा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडला असल्याने मतदान केंद्रांवर भल्या मोठा रांगा लागल्या आहेत .मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .
माहितीनुसार, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप–प्रत्यारोप करत मोठ्या आवाजात भिडले. काही जणांमध्ये हातघाईची वेळही आली होती. या गोंधळामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.
advertisement
घटनेची माहिती मिळताच बदलापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटांना वेगळं करून गर्दी पांगवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू राहावी म्हणून परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे गांधी नगर टेकडी परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण होते, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती अधिक बिघडण्यापासून रोखण्यात यश आले.
advertisement
मंत्री आणि पोलिसांमध्ये वाद...
भाजप नेते आशिष दामले आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे समोर आले. मतदान केंद्राबाहेर उभं राहण्यावरून बाचाबाची झाली. बेलवलीतल्या माजी कार्यालय परिसरात 100 मीटर बाहेर उभं राहण्यावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 02, 2025 10:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Shiv Sena Clash: भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले, बदलापूरमध्ये राडा, परिसरात तणाव








