एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडताच पुत्र श्रीकांत शिंदे दरे गावात दाखल, मुंबईला कधी परतणार?

Last Updated:

एकनाथ शिंदे गावी गेल्यानंतर आजारी पडल्यानं त्यांच्याशी इतर नेत्यांचाही संपर्क होऊ शकलेला नाही. तर श्रीकांत शिंदे हेसुद्धा दरे गावी दाखल झाले आहेत.

Eknath Shinde
Eknath Shinde
मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरू असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या मूळगावी गेले. यामुळे महायुतीची बैठक पुढे ढकलावी लागली. महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील हे आता स्पष्ट झालंय. पण मंत्रि‍पदांचं वाटप आणि उपमुख्यमंत्रिपद याचा पेच अद्याप सुटलेला नाही. शिंदे गावी गेल्यानंतर आजारी पडल्यानं त्यांच्याशी इतर नेत्यांचाही संपर्क होऊ शकलेला नाही. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर हेसुद्धा न भेटताच दरे गावातून परतल्याची माहिती समजते.
एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांच्या दरे गावातील निवासस्थानीच उपचार करण्यात आले. त्यांना १०४ डिग्री ताप आला होता आणि घशाला इन्फेक्शन झालं आहे. सर्दी आणि खोकल्यामुळे इन्फेक्शन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्या रक्ताची तपासणी केली असून काळजीचे काही कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच रात्री उशिरा सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हेसुद्धा दरे गावात दाखल झाले. एकनाथ शिंदे हे रविवारी दुपारपर्यंत पुन्हा मुंबईला परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिंदे मुंबईत परतल्यानंतर पुन्हा सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग य़ेईल.
advertisement
मंत्रिमंडळाचा शपथविधी ५ डिसेंबरला आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. तसंच त्यांनी भाजप आमदार खासदारांसोबत घेतलेल्या व्हर्च्युअल बैठकीत बावनकुळे यांनी तुमच्या मनात आहे तेच मुख्यमंत्री होतील असं सांगत फडणवीसच मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत दिले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडताच पुत्र श्रीकांत शिंदे दरे गावात दाखल, मुंबईला कधी परतणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement