Uddhav Thackeray : 'उद्धवजी, जय महाराष्ट्र', निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या बड्या नेत्याची निवृत्ती, ठाकरेंना धाडलं पत्र
- Published by:Shreyas
Last Updated:
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्येष्ठ शिवसेना नेत्याने सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. उद्धव ठाकरेंना पत्र लिहून या नेत्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
प्रशांत बाग, प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्येष्ठ शिवसेना नेत्याने सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. उद्धव ठाकरेंना पत्र लिहून या नेत्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खान्देशातले ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यायचा निर्णय घेतला आहे. तब्बल 40 वर्षांपासून सुरेशदादा जैन राजकारणात सक्रीय होते.
उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात सुरेशदादा जैन यांनी शिवसेनेने पहिल्यांदा मंत्रिपद दिल्याबद्दल आभार मानले. तसंच यापुढे मार्गदर्शक म्हणून सहकार्य मागितलं तर नक्की करणार, असं सुरेशदादा जैन या पत्रात म्हणाले आहेत. उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून सुरेशदादा जैन यांची ओळख आहे.
advertisement

'2014 नंतर वयोमानानुसार आणि तब्येतीच्या कारणामुळे मी हळूहळू सक्रीय राजकारणातून बाहेर पडलो. आता आयुष्याच्या अंतिम टप्प्यात सक्रीय राजकारणात कोणताही भाग न घेता निवृत्त व्हायचं ठरवलं आहे, म्हणून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे,' असं सुरेशदादा जैन त्यांच्या पत्रात म्हणाले आहेत.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
May 09, 2024 7:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : 'उद्धवजी, जय महाराष्ट्र', निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या बड्या नेत्याची निवृत्ती, ठाकरेंना धाडलं पत्र


