शिंदेंचा आणखी एक आमदार अडचणीत, कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Last Updated:

शिवसेना शिंदे गटाचे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्याविरोधात विशेष न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

News18
News18
मागील काही दिवसांपासून महायुती सरकारचा भाग असलेला अजित पवार गट आणि शिंदे गटातील अनेक आमदार, खासदार आणि मंत्री वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत सापडताना दिसत आहेत. सध्या अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले आहेत. त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. यापूर्वी धनंजय मुंडेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या सगळ्या घडामोडीनंतर एकनाथ शिंदे गटाचा एक आमदार अडचणीत सापडला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्याविरोधात विशेष न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) जमिनीवर अतिक्रमण आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपांप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. विशेष न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) हे आदेश दिले आहेत.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
कुर्ला येथील रहिवासी असणारे रमेश बोरवा यांनी आमदार कुडाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीवर सुनावणी करताना विशेष न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी कुडाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तीनवेळा आमदार राहिलेल्या कुडाळकर यांनी कुर्ला येथे म्हाडाने सेवासुविधा आणि बागेसाठी आरक्षित केलेल्या भूखंडावर एक सभागृह आणि अनेक व्यावसायिक आस्थापने अनधिकृतपणे बांधली, असा आरोप तक्रारदाराने केला होता.
advertisement
तसेच बोरवा यांनी केलेल्या आरोपांबाबत काही कागदपत्रे प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात सादर केली होती. त्याची दखल घेऊन कुडाळकर यांच्यावरील आरोप सकृतदर्शनी गंभीर स्वरूपाचे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. कुडाळकर यांनी मतदारसंघात विकासकामांसाठी मंजूर केलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर केला. तसेच त्यांनी म्हाडाने आरक्षित केलेल्या भूखंडावर सभागृह आणि व्यावसायिक संकुले बांधली, या आरोपांत तथ्य असावं, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. त्यानंतर कोर्टाने एलसीबीला गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिंदेंचा आणखी एक आमदार अडचणीत, कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश
Next Article
advertisement
BMC Election:  'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईतल्या भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी
'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईत भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी
  • 'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईत भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी

  • 'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईत भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी

  • 'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईत भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी

View All
advertisement