advertisement

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याच्या २४ तासांतच झटका, चौकशी पथक जळगावात

Last Updated:

Gulabrao Devkar: श्रीकृष्ण शिक्षण संस्थेच्या वतीने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेण्यात आलेल्या तब्बल १० कोटी रुपयांच्या कर्जाबाबत चौकशी सुरू झाली आहे.

गुलाबराव देवकर
गुलाबराव देवकर
जळगाव: माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून अजित पवार गटात प्रवेश केल्याच्या घटनेनंतर अवघ्या चोवीस तासांतच त्यांच्या संस्थेने घेतलेल्या कर्ज प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
श्रीकृष्ण शिक्षण संस्थेच्या वतीने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेण्यात आलेल्या तब्बल १० कोटी रुपयांच्या कर्जाबाबत ही चौकशी आहे. या संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर आहेत. हे कर्ज बेकायदेशीररीत्या घेतले गेले असल्याचा आरोप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला होता.
त्यांनी देवकर यांच्यावर अनेक आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत, घोटाळ्यांना झाकण्यासाठीच त्यांनी पक्षबदल केला, असा आरोप केला होता.  त्यांच्या आरोपांची चर्चा सुरू असतानाच आज सकाळी सहकार विभागाचे पथक जळगाव जिल्हा बँकेत दाखल झाले.
advertisement
शिरपूर येथील सहायक निबंधक राजेंद्र वीरकर यांच्या नेतृत्वाखाली हे पथक चौकशीसाठी आले असून, धुळे जिल्हा उपनिबंधकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे. दरम्यान, बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी चौकशी पथकास संपूर्ण सहकार्य केले जात असून, मागितलेली सर्व कागदपत्रे प्रदान केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. राजकीय गोटात या घडामोडींची जोरदार चर्चा असून, गुलाबराव देवकर यांच्यावर दबाव वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement

कोण आहेत गुलाबराव देवकर?

गुलाबराव देवकर हे खान्देशातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत
खान्देशात पक्षाची वाढ होण्याकरिता शरद पवार यांनी देवकर यांना मंत्रिपद दिले होते
त्यांच्या परीने पक्षाची वाढ करण्याकरिता देवकर यांनी प्रयत्न केले
पण त्यांच्या प्रयत्नांना फारसे यश आले नाही, खान्देशात राष्ट्रवादीचा फारसा विस्तार झाला नाही
मात्र खान्देशातील राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून त्यांची ओळख राहिली
advertisement
गुलाबराव पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची आहे
आताच्या विधानसभेला त्यांचा पराभव झाला
लोकांची कामे करण्यासाठी सत्तेत असले पाहिजे, असे मत झाल्याने अजित पवार गटात प्रवेश केला
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याच्या २४ तासांतच झटका, चौकशी पथक जळगावात
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement