भाजपची स्नेहा बनली महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगरसेविका, 21व्या वर्षी बिनविरोध, पुतणीसाठी चुलतीची माघार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Mukhed Nagar Parishad Election: स्नेहा तमशेट्टे असं बिनविरोध निवडून आलेल्या तरुणीचं नाव आहे. नांदेड जिल्ह्याच्या मुखेड नगरपरिषदेतून तिची बिनविरोध निवड झाली आहे.
मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड: नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याच्या मुदत संपली आहे. आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. आपला प्रतिस्पर्धी कोण असणार? हेही चित्र स्पष्ट झालं आहे. पण या निवडणुका पार पडण्याआधी महाराष्ट्रात जवळपास १०० ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. यात नांदेडच्या एका २१ वर्षांच्या तरुणीचा देखील समावेश आहे. ती बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आली. ती महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगरसेविका बनली आहे.
स्नेहा तमशेट्टे असं बिनविरोध निवडून आलेल्या तरुणीचं नाव आहे. नांदेड जिल्ह्याच्या मुखेड नगरपरिषदेतून तिची बिनविरोध निवड झाली आहे. तिला भाजपकडून तिकीट देण्यात आलं होतं. तिची बिनविरोध निवड झाल्याने भाजपनं नांदेड जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत खातं उघडलं आहे.
मुखेडमधील प्रभाग क्रमांक 4 हा महिला ओबीसीसाठी राखीव आहे. या प्रवर्गात भाजपाने स्नेहा तमशेट्टे यांना उमेदवारी दिली होती. याच प्रभागातून काँग्रेस आणि दोन अपक्ष उमेदवार देखील रिंगणात होते. मात्र उमेदवारी अर्जाच्या छाननीत काँग्रेस आणि एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला. अशात स्नेहा तमशेट्टे आणि त्यांची चुलती अपक्ष उमेदवार जयश्री तमशेट्टे रिंगणात होत्या.
advertisement
मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चुलती जयश्री तमशेट्टे यांनी माघार घेतली. त्यामुळे पुतणी स्नेहा तमशेट्टे बिनविरोध निवडून आल्या. त्या बिनविरोध निवडून येताच प्रभागात जल्लोष करण्यात आला. अनेकांनी घरी येऊन स्नेहा तमशेट्टे यांनी शुभेच्छा दिल्या. स्नेहा तमशेट्टी या महाराष्ट्रातील यावर्षीच्या सर्वात तरुण नगरसेविका बनण्याचा मान मिळवला आहे. देवेंद्र फडणवीस हे २२ व्या वर्षी पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
view commentsLocation :
Mukhed,Nanded,Maharashtra
First Published :
November 22, 2025 12:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपची स्नेहा बनली महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगरसेविका, 21व्या वर्षी बिनविरोध, पुतणीसाठी चुलतीची माघार


