सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरभरती, मिळणार 47,600 पगार; संपूर्ण Detail बातमीमध्ये
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
VMGMC Solapur Recruitment 2025: सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 'गट- ड'साठी नोकरभरती केली जाणार आहे. समकक्ष पदासाठी ही नोकरभरती होणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
राज्यामध्ये सध्या शिक्षकांची भरती होत आहे. आता अशातच सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही नोकरभरती केली जाणार आहे. सोलापूरच्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षकांसाठी नोकरभरती नसून 'गट- ड'साठी ही नोकरभरती आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागामार्फत भरती प्रक्रिया राबवली जात आहे. समकक्ष पदासाठी ही नोकरभरती होणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गट ड (वर्ग ४) पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. समकक्ष पदांसाठी एकूण 20 रिक्त जागा आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरू झाली असून शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2025 आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 23 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून ती 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. ऑनलाईन अर्जासोबतच परीक्षा शुल्काचा भरण्याची अंतिम तारीखही 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत रात्री 11:59 वाजेपर्यंतची मुदत आहे.
advertisement
पात्र उमेदवारांना परीक्षेची तारीख आणि हॉलतिकीटाबद्दलची माहिती अधिकृत संकेतस्थळावरून मिळेल. हॉलतिकीट पात्र उमेदवारांना ईमेलच्या माध्यमातून किंवा अधिकृत संकेतस्थळावरून मिळेल. एकूण 20 जागांवर होत असलेल्या भरतीप्रक्रियेमध्ये आरक्षण आहे. भरतीमध्ये अनुसूचित जमातींसाठी 2 जागा, विमुक्त जाती (अ) साठी 3 जागा, भटक्या जमाती (ब) साठी 1 जागा, भटक्या जमाती (क) साठी 1 जागा, भटक्या जमाती (ड) साठी 1 जागा, इतर मागास वर्गासाठी 2 जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 2 जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी 8 जागा जागा राखीव आहेत.
advertisement
महिला, दिव्यांग व्यक्ती, अनाथ, माजी सैनिक, खेळाडू आणि प्रकल्पग्रस्तांसाठीही या आरक्षणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी एक जागा आरक्षित आहे, जी सामाजिक आरक्षण श्रेणीतील गुणवत्तेनुसार भरली जाईल. यामध्ये अल्पदृष्टी, श्रवणदोष, शारीरिक अपंगत्व आणि बौद्धिक अपंगत्व यांसारख्या उपश्रेणींचा समावेश आहे, ज्यासाठी विशिष्ट जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 1000 रुपये आहे, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 900 रुपये आहे. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क नाही.
advertisement
जाहिरातीमध्ये अर्ज शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जागांची संख्या बदलल्यास, आरक्षण बदलल्यास, भरती प्रक्रिया रद्द झाल्यास किंवा पुढे ढकलल्यासही परीक्षा शुल्क परत मिळणार नाही, असे स्पष्ट नमुद करण्यात आले आहे. भरती संदर्भातील सविस्तर माहिती महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जामध्ये चुकीची माहिती देणाऱ्याचा अर्ज रद्द केले जाऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. या पदांसाठी वेतनश्रेणी एस-1 असून, ती 15,000 ते 47,600 रुपये इतकी आहे. शासकीय सेवेत येण्याची ही एक चांगली संधी आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
October 25, 2025 7:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरभरती, मिळणार 47,600 पगार; संपूर्ण Detail बातमीमध्ये


