मित्राचा विरह जिव्हारी! अंत्यसंस्कार सुरू असताना जिगरी दोस्ताने संपवलं जीवन, सोलापुरातील मन हेलावणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सोलापूर जिल्ह्याच्या मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मित्राने जीवन संपवल्यानंतर त्याचं दुःख सहन न झाल्यानं दुसऱ्या मित्रानेही टोकाचं पाऊल उचललं आहे.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका मित्राने आत्महत्या केल्यानंतर त्याचं दुःख सहन न झाल्यानं दुसऱ्या मित्रानेही टोकाचं पाऊल उचललं आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावात दोन जिवलग मित्रांनी काही तासांच्या अंतराने अशाप्रकारे जीवन संपवल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
गोरख भोई आणि सुरेश भोई अशी आत्महत्या केलेल्या या दोन जिवलग मित्रांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम गोरख भोई या तरुणाने वांगी येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. या दुर्दैवी घटनेनंतर गोरखचा जिवलग मित्र सुरेश भोई याला हे दुःख सहन झाले नाही.
advertisement
मित्राचा विरह जिव्हारी लागल्याने सुरेशनेही आयुष्याचा शेवट केला. गोरख भोई याच्यावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच, दुसरीकडे सुरेश भोई यानेही जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्याने शेतात जाऊन झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सुरेश भोई याचे आई-वडील मोलमजुरी, शेतात काम करून उदरनिर्वाह करतात.
दोन तरुणांच्या अचानक जाण्याने भोई कुटुंबावर आणि संपूर्ण वांगी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दोन्ही दुर्दैवी घटनांची नोंद दक्षिण सोलापूरमधील मंद्रूप पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या आत्महत्येमागं आणि दुसरं काही कारण आहे का? दोघांनी आत्महत्या का केली? त्यांना कुणी आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं का? याचा सविस्तर तपास मंद्रूप पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
November 24, 2025 11:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मित्राचा विरह जिव्हारी! अंत्यसंस्कार सुरू असताना जिगरी दोस्ताने संपवलं जीवन, सोलापुरातील मन हेलावणारी घटना!


