90 दिवसांचा कालावधी , एकरी फक्त 15,000 खर्च, हिवाळ्यात या पिकातून करा, 2,50,000 पर्यंत कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Green Pease Farming : रब्बी हंगाम सुरू होताच शेतकरी पीक निवडीबाबत नियोजन करतात. या काळात वाटाणा शेती सर्वात फायदेशीर पर्याय ठरत आहे.
रब्बी हंगाम सुरू होताच शेतकरी पीक निवडीबाबत नियोजन करतात. या काळात वाटाणा शेती सर्वात फायदेशीर पर्याय ठरत आहे. कमी कालावधीत तयार होणारे हे पीक योग्य तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची माहिती वापरून घेतल्यास शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा नफा मिळू शकतो. गेल्या काही वर्षांत वाटाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून शहरांमध्ये, सुपरमार्केटमध्ये, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आणि फूड प्रोसेसिंग कंपन्यांकडून या पिकाला प्रचंड मागणी होत आहे.
advertisement
लागवडीचा योग्य काळ कोणता? वाटाण्याची पेरणी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत करणे सर्वात योग्य मानले जाते. हलकी ते मध्यम काळी, निचरा चांगला असलेली जमीन या पिकासाठी अनुकूल आहे. एका एकरासाठी अंदाजे 18 ते 20 किलो प्रतीरोपक्षम बियाण्यांची गरज असते. आणि ओळींमध्ये 45 सें.मी. अंतर ठेवणे असे केल्याने उत्पादनवाढीस मदत होते.
advertisement
advertisement
किती खर्च येतो? - वाटाण्याची शेती पाहता एकरी खर्च इतर भाजीपाला पिकांच्या तुलनेत कमी आहे. एका एकरासाठी बियाणे, मशागत, खत, पाणी, कीडनाशके आणि मजुरी यासह एकूण खर्च साधारणपणे 15,000 ते 19,000 रुपये येतो. योग्य पद्धतीने नियोजन केल्यास एका एकरातून सरासरी 25 ते 35 क्विंटल वाटाण्याचे उत्पादन मिळू शकते. बाजारभाव सामान्यतः 60 ते 120 रुपये किलोपर्यंत असतो. यावरून 70 ते 90 रुपये सरासरी दर गृहित धरला तरी शेतकऱ्यांना एका एकरातून 1,60,000 ते 2,70,000 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. खर्च वजा केला तर एकरी 1,40,000 ते 2,50,000 रुपयांपर्यंत निव्वळ नफा हातात येतो.
advertisement


