advertisement

मोठी बातमी, मालेगाव पालिकेत भाजप आणि काँग्रेस आले एकत्र, गट सुद्धा केला स्थापन

Last Updated:

ज्या काँग्रेसवर एकदाही टीका  करण्याची संधी सोडली जात नाही, त्या काँग्रेससोबत भाजपने हातमिळवणी केल्याची घटना घडली

News18
News18
मालेगाव : राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम एकत्र आल्याची घटना घडली होती. पण राज्यभरात वाद झाल्यानंतर भाजपकडून माघार घेण्यात आली. पण, आता ज्या काँग्रेसवर एकदाही टीका  करण्याची संधी सोडली जात नाही, त्या काँग्रेससोबत भाजपने हातमिळवणी केल्याची घटना घडली आहे. मालेगाव महापालिकेमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहे.
मालेगाव महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे, पण महापौर आणि उपमहापौरपदाची निवड अजून बाकी आहे. सत्ता स्थापनेसाठी हालचाल सुरू आहे. अशातच काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहे. काँग्रेसचे 3 आणि भाजप 2 नगरसेवकांनी एकत्र येत 5 नगरसेवकांचा गट स्थापन केला आहे. याबद्दल  तशी नोंद सुद्धा केली आहे. भारत विकास आघाडी नावाने हा गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाच्या गट नेतेपदी काँग्रेसचे एजाज बेग यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस-भाजपचा गट महापालिकेत इस्लाम पार्टीला पाठिंबा शक्यता आहे.
advertisement
मालेगाव पालिका पक्षीय बलाबल
इस्लाम पक्ष - ३५
एम.आय.एम. (AIMIM)- २१
शिवसेना (एकनाथ शिंदे गट)- १८
समाजवादी पार्टी (SP)- ०५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -०३
भारतीय जनता पार्टी (BJP) -०२
एकूण -८४
महापौरपदाचं नाव निश्चित
दरम्यान, महापौर पदासाठी काढण्यात आलेल्या आरक्षणात मालेगावसाठी सर्व साधारण महिला आरक्षण निघाल्या नंतर महापौर कोण होणार यासाठी हालचालींना वेग आला आहे. महापौरचा निर्णय इस्लाम पार्टीचे प्रमुख माजी आमदार आसिफ शेख घेणार आहे. आसिफ शेख यांच्या बंधूच्या पत्नी नसरीन शेख यांना महापौरची संधी देणार असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे. नियमानुसार, महापौर आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर 8 ते 12 दिवसात महापौर सोबत उपमहापौराची निवड करावी लागते. त्यासाठी महापालिकेची विशेष सभेचं आयोजन करावं लागतं. सभेच्या 3 दिवस अगोदर नूतन नगरसेवकांना अजेंडा पाठवला जातो. आता सभा कोणत्या दिवशी बोलावली जाणार आहे आणि त्यात महापौराचे नाव जरी निश्चित मानलं जात असले तरी उपमहापौर पदी कोणाची वर्णी लागते याकडे मालेगाव शहरातील नागरिकांचे लक्ष लागलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी, मालेगाव पालिकेत भाजप आणि काँग्रेस आले एकत्र, गट सुद्धा केला स्थापन
Next Article
advertisement
सोन्या-चांदीच्या भावात 'महाभूकंप'; दरात इतिहासातील सर्वात मोठी घसरण, लाखात कमावणाऱ्यांचे कोट्यवधी बुडाले
सोन्या-चांदीच्या भावात महाभूकंप;दरात इतिहासातील सर्वात मोठी घसरण,कोट्यवधी बुडाले
  • सोन्या-चांदीला जबरदस्त झटका

  • इतिहासातील सर्वात मोठी घसरण

  • चांदी 16% कोसळली, सोनंही 7% घसरलं

View All
advertisement