रहस्यमय! जवळच घर तरी 6 महिने 5 स्टार हॉटेलमध्ये राहिली महिला, रूममधील गोष्टी पाहून पोलीसही चक्रावले
- Published by:Kiran Pharate
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
एक महिला तब्बल 6 महिने छत्रपती संभाजीनगरच्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी, कशासाठी?
छत्रपती संभाजीनगर : शहरात एक अतिशय धक्कादायक आणि रहस्यमय प्रकरण समोर आलं आहे. पडेगावच्या चिनार गार्डन भागातील कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय 45) ही महिला तब्बल सहा महिन्यांपासून जालना रोडवरील अॅम्बेसेडर या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहात असल्याचं उघड झालं आहे. शहरातच राहात असूनही ती एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये इतक्या दीर्घ काळ राहिली, यामागे तिचा नेमका उद्देश काय, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
शनिवारी (22 नोव्हेंबर) पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर सिडको पोलिसांनी हॉटेलमध्ये धाड टाकली. हॉटेल व्यवस्थापनाकडून गेस्ट लिस्ट आणि कागदपत्रांची छाननी केल्यानंतर तिच्या आधारकार्डवर फेरफार झाल्याचं स्पष्ट दिसून आलं. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू झाली. चौकशीत तिने आपलं वास्तव्य पडेगावमधील असल्याचं सांगितलं, तेव्हा पोलीसही आश्चर्यचकित झाले. शहरातील रहिवासी असूनही, ती सहा महिने पंचतारांकित हॉटेलमध्ये राहते. एवढा खर्च कसा आणि का? याबाबत विचारणा केली असता ती सतत टाळाटाळ करत आहे. तिची उत्तरं दिशाभूल करणारी आणि संदिग्ध असल्याने पोलिसांचा संशय आणखी बळावला.
advertisement
याहूनही अकल्पित बाब म्हणजे, तिच्याकडे UPSC च्या 2017 मधील निवड यादीची एक छापील प्रत आढळली. ज्यात तिचं नाव 333 क्रमांकावर असल्याचा उल्लेख होता. मात्र छाननीत ही यादीही बनावट असल्याचं निष्पन्न झालं. त्या यादीविषयी देखील तिने कोणतीही स्पष्ट माहिती न दिल्याने तिच्या उद्देशांवर अधिक प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तिच्या मोबाइल फोनमध्ये दोन सिमकार्ड वापरल्याचंही समोर आलं असून याचा तपासही सुरू आहे. बनावट ओळखपत्र देऊन हॉटेलमध्ये राहिल्याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिला अटक केली आहे.
advertisement
रविवारी (२३ नोव्हेंबर) न्यायालयात हजर केल्यानंतर तिला २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तिचा आर्थिक स्त्रोत, हॉटेलमध्ये दीर्घ मुक्कामामागील कारणं, बनावट कागदपत्रांचा वापर आणि इतर कोणते हेतू आहेत का? याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहेत. सध्या तिच्या मागील सहा महिन्यांच्या हालचालींची पडताळणी सुरू असून, तिचा खरा उद्देश उघड होईपर्यंत हे प्रकरण एक मोठं कोडंच ठरत आहे.
advertisement
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 24, 2025 11:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
रहस्यमय! जवळच घर तरी 6 महिने 5 स्टार हॉटेलमध्ये राहिली महिला, रूममधील गोष्टी पाहून पोलीसही चक्रावले


