भारत-पाकिस्तान फाळणी, स्वातंत्र्य लढ्यातील दुर्मिळ छायाचित्रांचे सोलापुरात प्रदर्शन, तारीख अन् लोकेशन काय?

Last Updated:

या प्रदर्शनामध्ये 1857 ते 1947 पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना, ऐतिहासिक स्थळे, सोलापुरातील चार हुतात्मे, सेल्फी बूथ, भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी आणि घटनांचे दुर्मिळ छायाचित्रे व मजकूर सहित माहिती असणार आहे.

+
डिजिटल

डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शन

इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी आणि स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित तीन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन सोलापूर शहरात करण्यात आले आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर आणि मध्य रेल्वे सोलापूर विभाग यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्य महोत्सव, हर घर तिरंगा आणि विभाजन विभिषिका स्मृति दिवस निमित्ताने सोलापूर रेल्वे स्टेशनमधील जनरल तिकीट खिडकीच्या जवळील जागेत हे आयोजन करण्यात आले आहे. 14 ऑगस्ट 2024 ते 16 ऑगस्ट 2024 दरम्यान, हा या आयोजनाचा कालावधी असणार आहे. याबाबत वरिष्ठ वाणिज्य विभागीय प्रबंधक योगेश पाटील यांनी लोकल18 शी बोलताना अधिक माहिती दिली.
advertisement
हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये 1857 ते 1947 पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना, ऐतिहासिक स्थळे, सोलापुरातील चार हुतात्मे, सेल्फी बूथ, भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी आणि घटनांचे दुर्मिळ छायाचित्रे व मजकूर सहित माहिती असणार आहे.
advertisement
खिल्लार गायींच्या गोमुत्रातून लाखोंची उलाढाल, सोलापुरातील भाऊ-बहिणीची कमाल!
भारतीय स्वातंत्र्यलढ्याबद्दल रेल्वे प्रवासी आणि सामान्य नागरिकांना माहिती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जास्तीत जास्त नागरिक, इतिहास अभ्यासक, संशोधक, स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी आणि युवकांनी छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी केले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
भारत-पाकिस्तान फाळणी, स्वातंत्र्य लढ्यातील दुर्मिळ छायाचित्रांचे सोलापुरात प्रदर्शन, तारीख अन् लोकेशन काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement