Akshay Shinde Encounter : एन्काउंटरचं समर्थन नाही, पण विरोधकांची भूमिका गांडुळासारखी; अजित पवारांची प्रतिक्रिया
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अक्षय शिंदे हा नराधम होता, त्यानं लहान मुलींवर अत्याचार केला. त्यानं कसा अत्याचार केला ते सांगू शकत नाही इतका हरामखोर होता.
विरेंद्र उत्पत, प्रतिनिधी
करमाळा : अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण एन्काउंटरचं समर्थन करत नसल्याचं म्हटलंय. मात्र विरोधकांची भूमिका या प्रकरणात गांडुळासारखी असल्याची टीकाही त्यांनी केली. करमाळ्यात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार बोलत होते. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अक्षय शिंदे हा नराधम होता, त्यानं लहान मुलींवर अत्याचार केला. त्यानं कसा अत्याचार केला ते सांगू शकत नाही इतका हरामखोर होता.
advertisement
अजित पवार यांनी म्हटलं की, अत्याचारानंतर बदलापूरमध्ये लोकांनी आरोपीला अटक करण्याची आणि फाशी देण्याची मागणी केली. रेल्वे रोखून धरली. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यावर प्रकरण उघडकीस आली. देशभरात चर्चा झाली. विरोधकांनी राज्यात महिला असुरक्षित असल्याचे आरोप केले. त्याला पकडल्यानंतर कारवाई सुरू झाली.
advertisement
पोलीस त्याला नेत असताना एका पोलिसावर गोळीबार केला. तीन गोळ्या झाडल्या. एकाला लागली. जर तो विकृत माणूस पोलिसांना मारायला लागला तर पोलीस गप्प बसतील का, पोलिसांनी गोळीबार केला. त्यात तो गेला. त्याला जन्मठेप द्या. पण तो लवकर गेला. मी एन्काउंटरचं समर्थन करत नाही. स्वसंरक्षणासाठी केलं असं पोलीस सांगतायत. त्याची चौकशी होईल असंही अजित पवार यांनी म्हटलं.
advertisement
अक्षयच्या एन्काउंटरनंतर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले की, विरोधक म्हणतायत का मारला, तुम्हीच म्हणत होता फाशी द्या, आता असं बोलताय. म्हणजे गांडुळासारखं झालं दोन्ही बाजूने, असं कसं चालेल. दोन मुलींवर अत्याचार केला, त्याला लाज वाटली नाही. याचं राजकारण विरोधक करतायत. चौकशीत सगळं निष्पन्न होतील. त्याला दोन पत्नी होत्या. त्याच्या दुसऱ्या पत्नीने पोलिसात तक्रार केली. नामांकित शाळेत हे घडलं. या गोष्टीचा विचार करा. माझा कार्यकर्ता चुकला तरी मी म्हणतो बघा तुमचं तुम्ही त्याला टायरमध्ये घ्यायचं की कसं ते, आम्ही कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही अन्याय अत्याचार करू नका.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2024 2:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Akshay Shinde Encounter : एन्काउंटरचं समर्थन नाही, पण विरोधकांची भूमिका गांडुळासारखी; अजित पवारांची प्रतिक्रिया


