Solapur Loksabha : सोलापुरात लोकसभेआधी वातावरण गरम! प्रणिती शिंदेंचे 'ते' बॅनर काही तासांत हटवले
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Solapur Loksabha : सोलापुरात लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आमदार प्रणिती शिंदे यांचे भावी खासदार असे बॅनर लावण्यात आले होते.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर, 1 सप्टेंबर : सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून आमदार प्रणिती शिंदे यांची सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून वरिष्ठ पातळीवर शिफारस केली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. सोलापुरातील पार्थ चौकात सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरवर आमदार प्रणिती शिंदे यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. सोलापूर महानगरपालिकाकडून अवघ्या काही तासात हे बॅनर हटवण्यात आले. त्यामुळे सोलापूर लोकसभेच्या जागेवरून सोलापुरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आमदार प्रणिती शिंदे ह्या सध्या सोलापूर जिल्ह्यात विरोधी पक्षाच्या एकमेव आमदार आहेत.
advertisement
आमदार प्रणिती शिंदे ह्या सध्या सोलापूर लोकसभेच्या दृष्टिकोनातून मतदारसंघाचा आढावा घेत असल्याची माहिती मिळत आहे. सोलापुरातील काँग्रेस भवनसमोर भावी खासदार म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांचे बॅनर लागले होते. त्यानंतर आता 4 सप्टेंबर रोजी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस आहे. सोलापूर काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांकडून भावी खासदार असा उल्लेख करून प्रणिती शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या पोस्टरबाबत तात्काळ कारवाई करत सदरचा पोस्टर काही तासांत हटवल्याचे दिसून आले आहे.
advertisement
सोलापूर लोकसभा हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. गेल्या दोन टर्मपासून माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना भाजपच्या नवाख्या उमेदवारांकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीकडून 2024 च्या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी विरोधी गटातील सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची जोरदार शिफारस करण्यात आली आहे. 2024 ला आमदार प्रणिती शिंदे हा गड राखणार काय हे पाहण्यासारखे असणार आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
September 01, 2023 5:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Loksabha : सोलापुरात लोकसभेआधी वातावरण गरम! प्रणिती शिंदेंचे 'ते' बॅनर काही तासांत हटवले


