Ashadhi Wari 2025: पंढरीत येणाऱ्या भाविकांसाठी मोठी गुडन्यूज; आज नवरात्रापासून दर्शनाचे नियम बदलले
- Published by:Ramesh Patil
- Written by:Virendrasigh Utpat
Last Updated:
Ashadhi Wari 2025: आजपासून श्री विठ्ठलाचे नवरात्र चालू झाले असून भाविकांसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले राहणार आहे. याबाबतची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
पंढरपूर (सोलापूर) : आषाढी वारी सोहळा जवळ आला आहे. 06 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. आपल्या लाडक्या पांडुरंगाचं, विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी हळूहळू वारकरी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत. काही वारकरी पंढरीत दाखलही झाले आहेत. वारीत दाखल होणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. तसेच आजपासून श्री विठ्ठलाचे नवरात्र चालू झाले असून भाविकांसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले राहणार आहे. याबाबतची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
आज सकाळी 11 वाजता महानैवेद्यानंतर देवाचा पलंग निघाला. आषाढी सोहळ्यासाठी देवाचे सर्व राजोपचार आजपासून बंद झाले आहेत. मंदिर आता भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुले राहणार आहे. आजपासून देवाला थकवा जाणवू नये म्हणून पाठीला कापसाचा लोड लावला आहे. आजपासून आषाढी यात्रा होईपर्यंत देव झोपण्यास जात नसल्यानं देवाचा पलंग निघणार आहे. त्यामुळं भाविकांना आजपासून 26 जुलैपर्यंत श्री विठ्ठलाचे 24 दर्शन सुरू राहणार आहे.
advertisement
आजपासून एका मिनिटात 30 ते 35 भाविक श्री विठ्ठलाचे पददर्शन घेऊ शकणार आहेत. तर दिवसभरात 30 ते 35 हजार भाविकांचे पददर्शन घडवले जाऊ शकते. साधारणपणे एक लाखाच्या आसपास भाविकांचे दररोज मुखदर्शन होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आजपासून म्हणजे 27 जून ते 16 जुलैपर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे.
advertisement
प्रक्षाळ पूजेनंतर विठ्ठल मंदिर रात्री दर्शनासाठी बंद राहणार आहे. आजपासून 'व्हिआयपी' दर्शन बंद असणार आहे. जास्तीत जास्त सर्वसामान्य वारकऱ्यांना दर्शनाचा लाभ मिळण्यासाठी दर्शन रांगेत आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आता आषाढी वारीचे वेध पांडुरंगाच्या भक्तांना लागले आहेत. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. ही वारी म्हणजे एक यात्रा नसून, वारकरी संप्रदायाच्या भक्तीचे, एकोप्याचे आणि सामाजिक समरसतेचे प्रतीक मानली जाते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरच्या विठोबा-रखुमाईच्या दर्शनासाठी पायी जातात. २०२५ मध्ये आषाढी एकादशी ६ जुलै २०२५ रोजी आहे.
view commentsLocation :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
June 27, 2025 1:49 PM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
Ashadhi Wari 2025: पंढरीत येणाऱ्या भाविकांसाठी मोठी गुडन्यूज; आज नवरात्रापासून दर्शनाचे नियम बदलले


