Addiction : वडिलांच्या व्यवसनाला वैतागला, मुलानं घेतला मोठा निर्णय, आता 50 हजार जणांचं व्यसन केलं बंद! Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
या तरुणांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी सोलापुरातील रामचंद्र वाघमारे हे गेल्या 15 वर्षांपासून काम करत आहेत. यासाठी त्यांनी सारथी युथ फाऊंडेशन उभारले असून मोफत काम करत आहेत.
सोलापूर : सिगारेट, दारू, तंबाखू तसेच मावा या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे माणसाचे आरोग्यदायी शरीर निरोगी बनत चालले आहे. सध्याच्या घडीला अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळत आहेत. या तरुणांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी सोलापुरातील रामचंद्र वाघमारे हे गेल्या 15 वर्षांपासून काम करत आहेत. यासाठी त्यांनी सारथी युथ फाऊंडेशन उभारले असून मोफत काम करत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर या गावाचे रामचंद्र गायकवाड हे मूळ रहिवासी आहेत. रामचंद्र यांच्या वडिलांनी बहिणीच्या लग्नासाठी कर्ज काढले होते. कर्जाचा डोंगर वाढत असताना तणावामुळे रामचंद्र यांच्या वडिलांना दारू, सिगारेटचे व्यसन लागले. त्यामुळे रामचंद्र यांच्या घरात नेहमी तणावाचे वातावरण असायचे. घरातील तणावाचे वातावरण, कर्जबाजारीपणा यातून रामचंद्र यांची मानसिक कुचंबणा होत होती. वडिलांचं व्यसन कसं कमी होईल? यावर ते विचार करायचे.
advertisement
कौटुंबिक अनुभवातून पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी गावामध्येच पूर्ण केले. समाजकार्याचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी गाव सोडले. समाजकार्याचे शिक्षण घेताना समाजातील व्यसनमुक्तीबाबत त्यांनी अभ्यास केला. मित्रांमध्ये विविध विषयावर चर्चा करीत असताना समाजातील युवकांच्या विविध अडचणी समोर आल्या. त्यातून सामाजिक संस्था सुरू करून याविषयी काम करण्याचा निर्णय रामचंद्र आणि त्याच्या मित्रांनी केला.
advertisement
सारथी युथ फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तंबाखू व्यसनमुक्ती विषयावर 2010 पासून निःशुल्क काम सुरू आहे. तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्पांतर्गत शाळा, महाविद्यालये आणि समुदाय स्तरावर तंबाखू व्यसनमुक्ती विषयी जनजागृती कार्यक्रम राबविले. यामध्ये किशोर आणि युवा अवस्थेतील तरुणांना तंबाखू दुष्परिणामांविषयी माहिती दिली. सारथीच्या माध्यमातून मागील 15 वर्षांमध्ये 50 हजारहून अधिक युवकांना समुपदेशनाचा लाभ मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांचे हे कार्य समाजासाठी खरोखरच प्रेरणादायी आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
May 03, 2025 4:12 PM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
Addiction : वडिलांच्या व्यवसनाला वैतागला, मुलानं घेतला मोठा निर्णय, आता 50 हजार जणांचं व्यसन केलं बंद! Video