वारकऱ्यांसाठी खुशखबर! आषाढी वारीनिमित्त धावणार विशेष गाड्या
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
आषाढी एकादशीला हजारोंच्या संख्येनं भाविक पंढरपूरला जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी गर्दी होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : लाडक्या विठूरायाच्या भेटीसाठी श्री संत महाराजांच्या पालख्यांसह वारकरी उरी प्रचंड भक्ती घेऊन पंढरपूरच्या वाटेवरून चालत आहेत. टाळ-मृदूंगाचा गजर, विठ्ठल-विठ्ठल नामघोष, असं अत्यंत प्रसन्न वातावरण यावेळी पाहायला मिळतंय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, याची चोख व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलीये.
वारीनिमित्त ठिकठिकाणचे वाहतूक मार्ग बदलले आहेत. तसंच आषाढी एकादशीला आणखी हजारोंच्या संख्येनं भाविक पंढरपूरला जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी गर्दी होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
- गाडी क्र. 01205 नागपूर-मिरज
विशेष गाडी नागपूर इथून दि. 14.07.2024 रोजी सकाळी 08.50 वाजता सुटेल आणि मिरज स्थानकावर दि. 15.07.2024 रोजी सकाळी 11.55 वाजता पोहोचेल.
- गाडी क्र. 01206 मिरज-नागपूर
विशेष गाडी दि. 18.07.2024 रोजी मिरज इथून दुपारी 12.55 वाजता सुटेल आणि नागपूर स्थानकावर दि.19.07.2024 रोजी दुपारी 12.25 वाजता पोहोचेल.
advertisement
थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तीजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमहांकाळ, सलगरे, आरग, मिरज.
संरचना: 08 स्लिपर + 07 जनरल + 1 तृतीय श्रेणी वातानुकुलीत + 02 एसएलआर = एकूण 18 कोचेस.
फेऱ्या: 01+01= 2
advertisement
- गाडी क्र. 01207 नागपूर-मिरज
विशेष गाडी नागपूर इथून दि. 15.07.2024 रोजी सकाळी 08.50 वाजता सुटेल आणि मिरज स्थानकावर दि. 16.07.2024 रोजी सकाळी 11.55 वाजता पोहोचेल.
- गाडी क्र. 01208 मिरज-नागपूर
विशेष गाडी यात्रा मिरज इथून दि. 19.07.2024 रोजी दुपारी 12.55 वाजता सुटेल आणि नागपूर स्थानकावर दि. 20.07.2024 रोजी दुपारी 12.25 वाजता पोहोचेल.
advertisement
थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तीजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमहांकाळ, सलगरे, आरग, मिरज.
संरचना: 14 स्लिपर + 2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत + 02 एसएलआर = एकूण 18 कोचेस.
फेऱ्या: 01+01= 2
- गाडी क्र. 01119 न्यू अमरावती-पंढरपूर
advertisement
विशेष गाडी न्यू अमरावती इथून दि. 13.07.2024 आणि 16.07.2024 रोजी दुपारी 02.40 वाजता सुटेल, तर पंढरपूर स्थानकावर दि. 14.07.2024 आणि 17.07.2024 रोजी सकाळी 09.10 वाजता पोहोचेल.
- गाडी क्र. 01120 पंढरपूर-न्यू अमरावती
विशेष गाडी दि. 14.07.2024 आणि 17.07.2024 रोजी पंढरपूर इथून संध्याकाळी 07.30 वाजता सुटेल. तर, न्यू अमरावती इथं दि. 15.07.2024 आणि 18.07.2024 रोजी दुपारी 12.40 वाजता पोहोचेल.
advertisement
थांबे: बडनेरा, मुर्तीजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर.
संरचना: 07 स्लिपर + 07 जनरल + 2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत + 02 एसएलआर = एकूण 18 कोचेस.
फेऱ्या: 02+02= 4
- गाडी क्र. 01121 खामगाव-पंढरपूर
विशेष गाडी खामगाव इथून दि. 14.07.2024 आणि 17.07.2024 रोजी सकाळी 11.30 वाजता सुटेल, तर पंढरपूर स्थानकावर 15.07.2024 आणि 18.07.2024 रोजी मध्यरात्री 3.30 वाजता पोहोचेल.
- गाडी क्र. 01122 पंढरपूर-खामगाव
विशेष गाडी पंढरपूर इथून दि. 15.07.2024 आणि 18.07.2024 रोजी पहाटे 5 वाजता सुटेल, तर खामगाव स्थानकावर त्याच दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता पोहोचेल.
थांबे: जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चालीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी आणि पंढरपूर.
संरचना: 07 स्लिपर + 07 जनरल + 2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत + 02 एसएलआर = एकूण 18 कोचेस.
फेऱ्या: 02+02 = 4
- गाडी क्र. 01159 भुसावळ-पंढरपूर
विशेष गाडी भुसावळ इथून दि. 16.07.2024 रोजी दुपारी 01.30 वाजता सुटेल आणि पंढरपूर इथं 17.07.2024 रोजी मध्यरात्री 3.30 वाजता पोहोचेल.
- गाडी क्र. 01160 पंढरपूर-भुसावळ
विशेष गाडी पंढरपूर इथून दि. 17.07.2024 रोजी रात्री 10.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 01.00 वाजता भुसावळ इथं पोहोचेल.
थांबे: जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, अंकाई, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी.
संरचना: 05 स्लिपर + 11 जनरल + 02 एसएलआर = एकूण 18 कोचेस.
- गाडी क्र.01101 लातूर-पंढरपूर-लातूर
विशेष गाडी लातूर स्थानकावरून दि. 12.07.2024, 15.07.2024, 16.07.2024, 17.07.2024 आणि 19.07.2024 रोजी सकाळी 7.30 वाजता सुटेल आणि पंढरपूर रेल्वे स्थानकावर अनुक्रमे त्याच दिवशी दुपारी 12.30 वाजता पोहोचेल.
- गाडी क्र.01102 पंढरपूर-लातूर-पंढरपूर
विशेष गाडी पंढरपूर स्थानकावरून दि. 12.07.2024, 15.07.2024, 16.07.2024, 17.07.2024 आणि 19.07.2024 रोजी दुपारी 01.50 वाजता सुटेल, तर लातूर रेल्वे स्थानकावर अनुक्रमे त्याच दिवशी रात्री 07.20 वाजता पोहोचेल.
थांबे: हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, उस्मानाबाद, पांगरी, बार्शी टाऊन, शेंद्री, कुर्डूवाडी, मोडनिंब.
संरचना: 08 स्लिपर + 04 जनरल + 02 एसएलआर = एकूण 14 कोचेस.
फेऱ्या: 05+05=08
- गाडी क्र.01107/01108 मिरज-पंढरपूर-मिरज
विशेष गाडी दि. 12.07.2024 पासून 21.07.2024 पर्यंत धावेल.
- मिरज इथून पहाटे 05.00 वाजता सुटेल आणि पंढरपूरला सकाळी 07.40 वाजता पोहोचेल.
- पंढरपूर इथून सकाळी 09.30 वाजता सुटेल आणि मिरजला दुपारी 01.50 वाजता पोहोचेल.
थांबे: अरग, बेलंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेट, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जवळा, वासुद, सांगोला.
संरचना: 12 डब्यांची मेमू
फेऱ्या: 10+10=20
- गाडी क्र.01209/01210 मिरज-कुर्डूवाडी-मिरज
विशेष गाडी दि. 12.07.2024 पासून 21.07.2024 पर्यंत धावेल.
- मिरज इथून दुपारी 03.10 वाजता सुटेल आणि कुर्डूवाडी इथं संध्याकाळी 07.00 वाजता पोहोचेल.
- कुर्डुवाडी इथून रात्री 09.25 वाजता सुटेल आणि मध्यरात्री 01.00 वाजता मिरजला पोहोचेल.
थांबे: अरग, बेलंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेट, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जवळा, वासुद, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब.
संरचना: 12 डब्यांची मेमू
फेऱ्या: 10+10=20
दरम्यान, आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला येणाऱ्या सर्व भाविकांनी या सर्व विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घेऊन आपला प्रवास सुखकर करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.
Location :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
July 05, 2024 8:08 AM IST