Poetry Writing: शिक्षण फक्त दुसरीपर्यंत, लिहिल्या 600 कविता, सोलापुरातील विमल यांची थक्क करणारी कहाणी
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
दुसरीपर्यंत शिक्षण घेऊन अखिल भारतीय साहित्य संमेलनाची व्यासपीठ गाजवणाऱ्या विमल माळी यांची ओळख महाराष्ट्रभर आधुनिक बहिणाबाई म्हणून आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर येथील विमलताई माळी यांनी महात्मा फुले यांचा वारसा जपला आहे. दुसरीपर्यंत शिक्षण घेऊन अखिल भारतीय साहित्य संमेलनाची व्यासपीठ गाजवणाऱ्या विमल माळी यांची ओळख महाराष्ट्रभर आधुनिक बहिणाबाई म्हणून आहे. दुसरीपर्यंत शिक्षण घेऊन साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
मोहोळ तालुक्यातील अनगर गावात 68 वर्षीय विमलताई माळी राहतात. त्यांचे शिक्षण दुसरीपर्यंत झाले आहे. आतापर्यंत विमलताई माळी यांनी 600 हून अधिक कविता लिहिल्या आहेत. तर तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. स्वतःचे आलेले अनुभव, शेतीत किंवा शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यांनी कवितेच्या माध्यमातून मांडण्यास सुरुवात केली.
advertisement
रान काव्य, हुंकार काळ्या आईचा आणि भक्ती जिव्हाळा हे त्यांचे प्रसिद्ध कवितासंग्रह आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्व प्रसार माध्यमांनी त्यांना आधुनिक बहिणाबाई म्हणून गौरवलेले आहे. आतापर्यंत दुसरीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विमल माळी यांना 108 स्थानिक पुरस्कार मिळाले आहेत.
advertisement
दुसरीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विमल माळी यांनी आजोबांकडून ऐकलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे विचार आणि आपल्या अनुभवातून आणि वाचनातून आलेले विचार हे आपल्या काव्यातून मांडत आहेत. विमल माळी या अल्पशिक्षित असूनही कविता करणे हा त्यांचा छंद झाला आहे. त्यांना कुणी विचारलं की तुमचं शिक्षण कितीपर्यंत झाले आहे किंवा तुमची डिग्री काय आहे तेव्हा ते खुरप हीच माझी डिग्री आहे, असे सांगतात. विमल माळी यांनी जवळपास 98 व्यासपीठांवर आपल्या कविता सादर केल्या आहेत. आजही विमल माळी यांच्या कवितेची मैफल जमली की आजूबाजूला श्रोत्यांचा गराडा पडतो.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jul 14, 2025 12:09 PM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
Poetry Writing: शिक्षण फक्त दुसरीपर्यंत, लिहिल्या 600 कविता, सोलापुरातील विमल यांची थक्क करणारी कहाणी




