CJI Bhushan Gavai: मी माझाच फेक Video... सरन्यायाधीश गवईंचा न्यायालयात 'कबुलीजबाब', प्रकरण नेमकं काय?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
CJI Bhushan Gavai: सर्वोच्च न्यायालयात सोमवारी न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासंबंधी योग्य नियम बनवण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली.
नवी दिल्ली : एआय अर्थात कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या चित्रफितींचा वापर हल्ली वाढला आहे. कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचे फोटो वापरून किंबहुना त्यांच्या चित्रफिती तयार करून त्या समाज माध्यमांवर प्रसिद्ध केल्या जातात. अनेकदा मूळ चित्रफित आणि एआय अर्थात कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून बनवलेली चित्रफित यामधील फरकही लवकर स्पष्ट होत नाही. या प्रकाराला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई देखील अपवाद नाहीत. त्यांनीही स्वत:च्या एआयने तयार केलेल्या चित्रफिती पाहिल्या आहेत. न्यायालयातच त्यांनी कबुलीजबाब दिला.
कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरून केलेल्या चित्रफिती, फोटोसारख्याच दिसणाऱ्या बनावट प्रतिमा किंवा आवाज वापरून तयार केलेले कॉल रेकॉर्ड आदींमुळे खरे कोणते खोटे कोणते हे शिकल्या सवरलेल्यांना देखील लवकर समजत नाही. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासंबंधी योग्य नियम बनवण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली. या चर्चेदरम्यान सरन्यायाधीश गवई आणि न्यायमुर्ती विनोद चंद्रन यांनी स्वतःबद्दल बनविलेले बनावट व्हिडिओ पाहिले असल्याचे स्मितहास्य करून सांगितले.
advertisement
'त्याच' प्रसंगावर आधारित 'कबुलीजबाब'?
गेल्या महिन्यात गर्दीने खचाखच भरलेल्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. याच घटनेची चित्रफित समाज माध्यमांवर एआय अर्थात कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून तयार केली होती. सरन्यायाधीश गवई यांनी हीच चित्रफित पाहिल्याचे सांगितले जाते. या घटनेची चित्रफित सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केली नव्हती. मात्र समाज माध्यमांवर एआने केलेल्या चित्रफिती वेगाने पसरल्या. ज्यामध्ये सरन्यायाधीश गवई यांच्या दिशेने बूट जात असल्याचे दाखविण्यात आले.
advertisement
याचिका फेटाळून लावू की सुनावणी पुढे ढकलू?
सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दोन आठवड्यांनंतर सुनावणीसाठी सूचिबद्ध करण्याची सूचना केली आहे. या महिन्यात निवृत्त होत असलेले सरन्यायाधीश गवई यांनी या प्रकरणाची सुनावणी करू इच्छित नसल्याचे संकेत दिले. त्यांनी याचिकाकर्ते कार्तिकेय रावल यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाला विचारले, "तुम्हाला काय हवे आहे? मी ही याचिका फेटाळून लावावी की दोन आठवड्यांनंतर ती सुनावणीसाठी सूचिबद्ध करावी?"
advertisement
याचिकाकर्त्यांचे नेमके म्हणणे काय?
न्यायालये स्वतः एआयचा वापर करतात. परंतु हा वापर सकारात्मक हेतूंसाठी केला जातो. न्यायालयांना एआयच्या धोक्यांबद्दल देखील माहिती असली पाहिजे. जनरेटिव्ह एआय उपलब्ध डेटाचे विश्लेषण करते आणि निष्कर्ष काढते. या तंत्रज्ञानामुळे चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती निर्माण होण्याची शक्यता असते. ती प्रदान करत असलेल्या माहितीमध्ये पारदर्शकता नसते आणि ती पक्षपाती असू शकते.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 10, 2025 7:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
CJI Bhushan Gavai: मी माझाच फेक Video... सरन्यायाधीश गवईंचा न्यायालयात 'कबुलीजबाब', प्रकरण नेमकं काय?


