Accident News : इलेक्शन ड्युटी संपवून घरी परतताना अपघात, शिक्षक आणि महसूल अधिकाऱ्याचा मृत्यू
- Published by:Suraj
Last Updated:
इलेक्शन ड्युटीवरून घरी परतताना जळगावमध्ये शिक्षकाचं अपघाती निधन झालं तर साताऱ्यात महसूल अधिकारी असणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात काल २८८ जागांसाठी मतदान झालं. मतदान प्रक्रियेत काही ठिकाणी सुरुवातीला गोंधळ झाला पण राज्यभरात सुरळीत मतदान पार पडलं. बीडमध्ये मतदान केंद्रात तोडफोडीची घटना आणि नागपूरमध्ये ईव्हीएम नेणाऱ्या गाडीवर हल्ल्याचे प्रकारही घडले. दरम्यान, मतदान प्रक्रिया संपल्यानंतर घरी परतताना अपघात होऊन दोन वेगवेगळ्या घटनात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जळगावमध्ये शिक्षकाचं निधन झालं तर साताऱ्यात महसूल अधिकारी असणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात शिक्षक लक्ष्मीकांत पाटील हे बीएलओ म्हणून मतदान केंद्रावर कार्यरत होते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ते बभळाज या गावी परतत असताना दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात लक्ष्मीकांत पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती निधनाने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
साताऱ्यातही अपघातात महसूल अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. निवडणूक प्रक्रियेचं काम संपवून घरी परतताना रोहित कदम या अधिकाऱ्याच्या गाडीला मध्यरात्री अडीच वाजता अपघात झाला. अपघातात रोहित कदम हे जागीच ठार झाले. दुचाकी उसाच्या ट्रॉलीला धडकून हा अपघात झाला. उडतारे इथं महामार्गावर ही दुर्घटना घडली.
advertisement
रोहित कदम यांच्या अपघाती मृत्यूनंतर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला. रोहित कदम हे जावलीतील आनेवाडी गावात ड्युटीवर होते. ते मूळचे भूईंज गावचे होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 21, 2024 11:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Accident News : इलेक्शन ड्युटी संपवून घरी परतताना अपघात, शिक्षक आणि महसूल अधिकाऱ्याचा मृत्यू