Kalyan News : कल्याण मध्यरात्री हादरलं! पोलिसांनी अचानक शहराचे रस्ते केले सील; नेमकं काय घडलं?
Last Updated:
Kalyan News : कल्याण आणि डोंबिवली परिसरात शनिवारी रात्री पोलिसांनी राबवलेल्या धडक धरपकड मोहिमेने शहरभरात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत पोलिसांच्या धडक मोहिमेने अक्षरशः खळबळ उडवून दिली आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या गैरकृत्यांवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी तब्बल आठ तास चाललेली ही मोहीम राबवली गेली आणि या कारवाईत तब्बल 350 हून अधिक समाजकंटक, गुंड, मद्यपी आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी अक्षरशः शहरात गुंडांची धिंड काढली तर काही ठिकाणी मद्यपींना सार्वजनिक ठिकाणी उठाबशा काढायला लावल्या.
कल्याण-डोंबिवलीमध्ये वाढती गुन्हेगारी
गेल्या काही दिवसांत कल्याण-डोंबिवली परिसरात रात्रीच्या वेळी चोरी, वाहनांची तोडफोड, रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद हालचाली आणि अंमली पदार्थांचे सत्र वाढले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 240 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून पहाटे चारपर्यंत मोहिमेत उतरले. रेल्वे स्थानक परिसर, गल्लीबोळ, रिकामे मैदान, झाडाझुडपांमागे, वाहनतळ, अशा ठिकाणी पोलिसांनी अचानक छापा टाकून धक्कादायक वास्तव समोर आणले.
advertisement
अनेक ठिकाणी पोलिसांच्या गाड्या दिसताच गुंड आणि मद्यपी पळ काढू लागले, पण पोलिसांनी चारही बाजूंनी घेराबंदी करून त्यांना पकडले. काहींना तर त्यांच्या गुन्ह्यांसह परिसरात फिरवून धिंड काढण्यात आली. नागरिकांनी हे दृश्य पाहताच परिसरात मोठी गर्दी जमली. मद्यपींमध्ये सुस्थितीत घरातील, शिक्षित तरुणांचाही समावेश असल्याचं उघड झालं, जे अधिक धक्कादायक होतं.
या मोहिमेत सहा खतरनाक गुंडांना अटक करण्यात आली असून 27 तडिपार गुंडांची तपासणी करण्यात आली. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांकडून तब्बल 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिसांनी या कारवाईदरम्यान भुरट्या चोरट्यांचे टोळके, रेल्वे स्थानक परिसरात अड्डे मांडणारे समाजकंटक तसेच रात्रीच्या अंधारात गैरधंदे करणाऱ्यांवर कारवाई केली.
advertisement
थेट होणार न्यायालयीन कारवाई
view commentsया मोहिमेमुळे रात्रीच्या शहराचा चेहरामोहरा बदलल्यासारखा झाला. रस्त्यांवर पोलिसांचे ताफे, सायरनचा आवाज, धावत सुटलेले गुंड आणि चौकात उभे असलेले अधिकारी, हे दृश्य चित्रपटातील सीनसारखं दिसत होतं. पोलिस ठाण्यात पकडलेल्या समाजकंटकांची चौकशी सुरू असून सर्वांवर गुन्हे दाखल करून न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 27, 2025 12:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Kalyan News : कल्याण मध्यरात्री हादरलं! पोलिसांनी अचानक शहराचे रस्ते केले सील; नेमकं काय घडलं?


