Kalyan News : वीज नाही, जनरेटर बंद! कल्याणच्या स्मशानभूमीत दुचाकीच्या प्रकाशात अंत्यसंस्काराची वेळ
Last Updated:
Kalyan News : कल्याणच्या सापर्डे गावातील स्मशानभूमीत वीज नसल्यामुळे मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार गाड्यांच्या हेडलाईटच्या प्रकाशात करावे लागले. स्मार्ट सिटी असूनही या गावातील मूलभूत सुविधा नसल्यामुळे नातेवाइकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
कल्याण : स्मार्ट सिटी असलेल्या कल्याणच्या सापर्डे गावातील एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. जिथे या गावातील स्मशानभूमीत वीजेची सोय नसल्यामुळे एका मृताच्या नातेवाइकांना चक्क गाडीच्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची वेळ ओढावली आहे.
सापर्डे गावात अलीकडेच एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतदेह घेऊन त्याचे नातेवाइक अंत्यसंस्कारासाठी गावातील स्मशानभूमीमध्ये गेले. पण अंत्यसंस्काराची वेळ रात्रीची असल्यामुळे आणि परिसर अंधारात असल्यामुळे नातेवाइकांसमोर अनेक अडचणी आल्या. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खूपच खराब स्थितीत होता, त्यामुळे मृतदेह नेणेही सोपे नव्हते.
स्मशानभूमीत विजेची व्यवस्था नसल्याने मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांना दुचाकीच्या हेडलाईट आणि टॉर्चवर अवलंबून रहावे लागले. मृतदेहाची सरण कशी करावी, कुठे ठेवावी, हे सगळे प्रश्न अंधारात उभ्या राहूनच सोडवावे लागले.
advertisement
स्थानीय लोकांच्या मते या स्मशानभूमीची काळजी घेतली जात नाही. येथे विजेची सोय, पायऱ्या किंवा रस्ता सुधारण्याचे काही काम झालेले नाही. त्यामुळे रात्री या ठिकाणी येणे अत्यंत कठीण होते. काही जण म्हणतात की, जर स्मशानभूमीची देखभाल केली गेली असती, तर मृतदेहाच्या नातेवाइकांना अशा अडचणींना सामोरे जावे लागले नसते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 11:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Kalyan News : वीज नाही, जनरेटर बंद! कल्याणच्या स्मशानभूमीत दुचाकीच्या प्रकाशात अंत्यसंस्काराची वेळ