लोकलची गर्दी टाळायला एक्स्प्रेस पकडली, अन्... कल्याण स्थानकात घडलं भयंकर

Last Updated:

घरी लवकर पोहोचता यावं आणि तेही कमी गर्दीतून प्रवास व्हावा हा मोह एका 50 वर्षीय प्रवाशाला भारी पडला. हा प्रवास त्यांच्यासाठी अखेरचा ठरला नाही, मात्र त्यांच्यासोबत अत्यंत भयंकर घडलं. 

News18
News18
कल्याण : लोकल ट्रेन जेव्हा बघावं तेव्हा खचाखच भरलेली असते. सकाळी कामावर जाताना आणि संध्याकाळी घरी परतताना तर प्रवासी अगदी जीव मुठीत घेऊन भर गर्दीतून प्रवास करतात. हा प्रवास काहीजणांच्या जीवावरही बेततो. परंतु गर्दी कमी असली तरी रेल्वेतून प्रवास काळजीपूर्वकच करावा लागतो. घरी लवकर पोहोचता यावं आणि तेही कमी गर्दीतून प्रवास व्हावा हा मोह एका 50 वर्षीय प्रवाशाला भारी पडला. हा प्रवास त्यांच्यासाठी अखेरचा ठरला नाही, मात्र त्यांच्यासोबत अत्यंत भयंकर घडलं.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हिंदोला असं या 50 वर्षीय प्रवाशाचं नाव. ते नवी मुंबई महानगरपालिकेत काम करतात. त्यांचं घर आहे टिटवाळ्यात. संध्याकाळच्या वेळी मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी असते. या गर्दीतून प्रवास नको म्हणून त्यांनी विदर्भ एक्स्प्रेसमधून प्रवास केला. शिवाय त्यांना घरी लवकर पोहोचायचं होतं. एक्स्प्रेसचा प्रवास सुस्साट असतो, त्यामुळे कल्याण स्थानकात उतरून दुसरी लोकल पकडेन आणि लवकर टिटवाळ्याला घरी पोहोचेन असा विचार त्यांनी केला. मात्र त्यांचं हे गणित पार चुकलं.
advertisement
अंकुश यांना एवढी घाई होती की, जवळ लोकलचा पास असताना ते अवैधरित्या एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. त्यात कल्याण स्थानकात चालत्या एक्स्प्रेसमधून उतरण्याची घाई त्यांनी केली. त्यानंतर जे घडलं ते बघून इतर प्रवाशांनी किंकाळ्या फोडल्या. अंकुश उतरताना एक्स्प्रेस आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडले, त्यातच त्यांचे दोन्ही पाय गेले. सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
advertisement
अंकुश यांना एक्स्प्रेसमधून पडताना पाहून इतर प्रवाशांनी आरडाओरडा केला. त्यानंतर एक्स्प्रेस थांबली आणि अंकुश यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. पुढच्या उपचारांसाठी त्यांना सायन रुग्णालयात हलविलं. तिथं त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्याचं कळतं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
लोकलची गर्दी टाळायला एक्स्प्रेस पकडली, अन्... कल्याण स्थानकात घडलं भयंकर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement