Kalyan Water Supply : कल्याणकरांनो पाणी जपून वापरा, 9 तास पाणीपुरवठा राहणार बंद, कधी आणि कुठं?
- Published by:Mohan Najan
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी पुरवठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
कल्याण : मोहिली जलशुद्धीकरण केंद्राच्या रॉ वॉटर चॅनल येथील गाळ काढणे, विद्युत आणि यांत्रिकी उपकरणाची दुरुस्ती करणे आदी कामांसाठी ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी, 28 ऑक्टोबर रोजी मोहिली येथील कच्चे पाणी उचलण्याच्या यांत्रिक मार्गिकेतील गाळ काढण्याच्या कामासाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. उद्या सकाळी 9 ते 6 या कालावधीत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी पुरवठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
मागील तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत महावितरणकडून देखभाल दुरुस्तीची कामे काढण्यात आल्याने पालिकेला पाणी पुरवठा बंद ठेवावा लागला आहे. या विद्युत आणि तांत्रिक देखभाल दुरुस्तीच्या काळात पालिकेच्या उदंचन आणि जलशुद्धीकरण केंद्रांना पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याने महावितरणच्या विनंती अर्जावरून पालिकेने मंगळवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
बारावे, मोहिली आणि नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व आणि पश्चिम, कल्याण ग्रामीण भागातील टिटवाळा, मांडा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, कोळीवाडा, बंदरनगर आणि परिसरातील गावांना पाणी पुरवठा केला जातो. डोंबिवली शहराला नेतिवली जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा केला जातो. नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रात मोहिली उदंचन केंद्रातून मंगळवारी पाणी येणार नाही. त्यामुळे मंगळवारी कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांनी 9 तास पुरेल इतके पाणी भरून ठेवावे. काम पूर्ण झाल्यावर पाणी कमी दाबाने येण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
October 27, 2025 8:40 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Kalyan Water Supply : कल्याणकरांनो पाणी जपून वापरा, 9 तास पाणीपुरवठा राहणार बंद, कधी आणि कुठं?


