Thane Water Supply: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, मंगळवारी या भागात पुरवठा बंद

Last Updated:

Thane water supply : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऐन पावसाळ्यात पाणी जपून वापरावं लागेल.

News18
News18
ठाणे: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऐन पावसाळ्यात पाणी जपून वापरावं लागेल. मंगळवारी ठाण्यातील काही भागात पाणी कपात होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम आणि शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्र येथे होत असलेली पाईपलाईन गळती बंद करणे आणि इतर आवश्यक कामे महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणार आहे.
सदरचे काम 24 तासांचा शटडाऊन घेऊन करण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 9.00 ते बुधवार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी 9.00 वा. पर्यत बंद राहणार आहे. तथापि ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्या टप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
advertisement
या कालावधीमध्ये घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकुम, ब्रम्हांड, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, डोंगरीपाडा, वाघबीळ, इत्यादी ठिकाणाचा पाणी पुरवठा मंगळवार दि .22 जुलैपासून सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजे पर्यंत बंद राहील. समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या आणि मुंब्राचा काही भाग मंगळवार दि. 22 जुलै रोजी रात्री 9.00 ते सकाळी 9.00 वा. पर्यंत बंद राहील. अश्या रीतीने टप्या टप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Water Supply: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, मंगळवारी या भागात पुरवठा बंद
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement