उन्हाळ्यात घालण्यासाठी खरेदी करा डेली वेअर कुर्ती, डोंबिवलीत फक्त 500 रुपयांपासून मिळतील 10 हून अधिक प्रकार Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
डोंबिवलीतील काजल बुटीकमध्ये अगदी 500 ते 600 रुपयांपासून ऑफिस वेअरसाठी लागणारे डेली वेअर कुर्ती आणि ड्रेसेस तेही कॉटनचे मिळतायेत. स्टेशनपासून जवळ असल्याने अनेक जणी या शॉपला आवर्जून भेट देत आहेत.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
डोंबिवली : हळूहळू उन्हाळा वाढत चालल्यामुळे तरुणी आणि महिला आता ऑफिस वेअरसाठी लागणाऱ्या मुलायम आणि सुती कपड्यांच्या शोधात आहेत. अशातच डोंबिवलीतील काजल बुटीकमध्ये अगदी 500 ते 600 रुपयांपासून ऑफिस वेअरसाठी लागणारे डेली वेअर कुर्ती आणि ड्रेसेस तेही कॉटनचे मिळतायेत. स्टेशनपासून जवळ असल्याने अनेक जणी या शॉपला आवर्जून भेट देत आहेत.
advertisement
तुम्हालाही सुंदर कुर्ती सेट आणि ड्रेस हवे असेल तर हे दुकान बेस्ट ऑप्शन आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे आणि त्यामुळे अनेकदा तुम्हाला कोणाच्या ना कोणाच्या लग्न समारंभात किंवा लग्नाच्या पार्टीला जावं लागतं असेल. जर तुमच्या जवळच्या, खास व्यक्तीची ही पार्टी असेल तर त्या प्रसंगी घालायला तुमच्याकडे उत्तम असा एखादा ड्रेस हवाच. या काजल बुटीकमध्ये तुम्हाला हव्या त्या प्रकारचा ड्रेस मिळेल. तुम्हाला इंडो वेस्टर्न कुर्ती, पटियाला सेट, लॉन्ग कुर्ती सेट असे सगळे ड्रेसेस उपलब्ध आहेत.
advertisement
डेलीवेअरच्या कुर्ती कलेक्शनमध्ये तुम्हाला अंगरखा कुर्ती, कालिदार कुर्ती, एलाइन कुर्ती, लखनवी कुर्ती, स्ट्रेट कट कुर्ती हे सगळे प्रकार मिळतील. तुम्हाला जर प्युअर कॉटनमध्ये प्लेन कुर्ती हवी असेल तर त्याची किंमत इथे फक्त 700 रुपयांपासून सुरू होते. सध्या मुलींमध्ये फ्लॉवर आणि चिकनकारी कुर्तीचा प्रकार ट्रेंडिंगमध्ये आहे. यामध्येही 10 हून अधिक प्रकार उपलब्ध आहेत. या प्रकारांमध्ये प्रिंटेड कुर्ती, प्लेन कुर्ती, फ्लॉवर कुर्ती, नायरा कट कुर्ती असे सगळे प्रकार उपलब्ध आहेत.
advertisement
'उन्हाळ्यासाठी अनेक जणी कॉटनचे कुर्ती घालण्याला प्राधान्य देतात. आमच्या इथला कपडा अत्यंत चांगला असल्याने डोंबिवलीकर आवर्जून आमच्याकडे शॉपिंगसाठी येतात. डेलीवेअरपासून आमच्याकडे लग्नासाठी लागणारे ड्रेसेसपर्यंत सगळे कपडे उपलब्ध आहेत. आणि यात जो रंग हवा असेल तो सुद्धा मिळेल' असे दुकानदार विक्रम सिंग यांनी सांगितले.
डोंबिवली रेल्वे स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या मानपाडा रोडवर हे काजल बुटीक नावाचे दुकान आहे. तुम्हालाही या उन्हाळ्यात कॉटनचे आणि सुती कापडाचे कपडे घालण्याची इच्छा असेल तर आवर्जून या काजल बुटीक ला भेट द्या.
advertisement
Location :
Thane,Maharashtra
First Published :
March 05, 2025 7:36 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
उन्हाळ्यात घालण्यासाठी खरेदी करा डेली वेअर कुर्ती, डोंबिवलीत फक्त 500 रुपयांपासून मिळतील 10 हून अधिक प्रकार Video