IPS अधिकाऱ्याला दमदाटी, तुमची भूमिका काय? शिंदेही सरकारमध्ये नाराज? अजित पवारांची 'दादा' स्टाईल उत्तरे

Last Updated:

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी पुण्यात होते. हडपसर येथे जनसंवाद कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याआधी दोन दिवस त्यांनी माध्यम प्रतिनिधींकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला.

अंजना कृष्णा-अजित पवार
अंजना कृष्णा-अजित पवार
पुणे : अवैध मुरुमाचे उत्खनन होत असताना ते थांबविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळ्याच्या पोलीस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा यांना फोन करून धमकावल्याने याची देशभरात चर्चा झाली. तुम्हीच अजित पवार आहात हे कशावरून? तुम्ही मला कॉल करा, असे धाडसाने महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी सांगितल्यावर अजित पवार यांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचला. अर्थात त्यांचा इगो हर्ट झाला. तुमच्यात एवढं धाडस आहे का? अशा गुर्मीच्या भाषेत अजित पवार यांनी पलटवार केला. तरीही अंजना कृष्णा डगमगल्या नाहीत. त्यांच्या कर्तव्य कठोर निष्ठेच्या स्वभावाचे कौतुक होत असताना दुसरीकडे अजित पवार यांच्यावर टीकेची राळ उडत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी पुण्यात होते. हडपसर येथे जनसंवाद कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याआधी दोन दिवस त्यांनी माध्यम प्रतिनिधींकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी कुर्डू फोन प्रकरण, एकनाथ शिंदे यांची सरकारवर कथित नाराजी, पुण्यातील आंदेकर-कोमकर टोळीयुद्द अशा प्रश्नांवर उत्तरे दिली.

आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा फोन प्रकरणावर अजित पवार यांची भूमिका

advertisement
राज्यातील एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी तुम्ही ज्या भाषेत बोललात ते जनतेला आवडले नाही, असे अजित पवार यांना विचारले असता, कुर्डू प्रकरणावर ट्विट करून मी माझी भूमिका मांडलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या भूमिकेची नोंद घेतलेली आहे. यापेक्षा मला अधिक काही बोलायचे नाही, असे अजित पवार म्हणाले. पत्रकारांनी याच विषयावर अधिक विचारण्याचा प्रयत्न केला मात्र मी माझी भूमिका मांडून झालेली आहे. मी अधिक काही बोलणार नाही, असे सांगत अजित पवार यांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
advertisement

एकनाथ शिंदे सरकारवर नाराज, अजित पवार म्हणाले, ते नाराज नाहीत हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?

एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यांच्या नाराजीवर अजित पवार यांना विचारले असता, एकनाथ शिंदे हे अजिबात नाराज नाहीत, हे मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असे अजित पवार म्हणाले. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत किंवा इतरही बैठकांत आम्ही तिघेही शेजारी बसतो. त्यावेळी ते नाराज असल्याचे अजिबात जाणवत नाहीत. लोकाभिमुख कारभार व्हावा, यासाठी आमचा तिघांचाही प्रयत्न असतो असे सांगत आमच्या तिघांचेही व्यवस्थित सुरू आहे, अशी कोपरखळी अजित पवार यांनी मारली.
advertisement

पुण्यातील आंदेकर-कोमकर टोळीयुद्धावर अजित पवार म्हणाले...

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आंदेकरांच्या कुटुंबातील सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत याकडे लक्ष वेधले असता, पक्षात विकृती असावी, असे कुणाला वाटत नाही. पोलिसांनी राजकीय दबाव सहन न करता कारवाई करावी, अशी भूमिका आंदेकर प्रकरणावर अजित पवार यांनी मांडली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IPS अधिकाऱ्याला दमदाटी, तुमची भूमिका काय? शिंदेही सरकारमध्ये नाराज? अजित पवारांची 'दादा' स्टाईल उत्तरे
Next Article
advertisement
Nagar Parishad Results: थेट निवडलेले नगराध्यक्ष, पण सत्ता दुसऱ्याच पक्षाची! नगर परिषदांचा खरा कारभारी कोण?
थेट निवडलेले नगराध्यक्ष, पण सत्ता दुसऱ्याच पक्षाची! नगर परिषदांचा खरा कारभारी को
  • थेट निवडलेले नगराध्यक्ष, पण सत्ता दुसऱ्याच पक्षाची! नगर परिषदांचा खरा कारभारी को

  • थेट निवडलेले नगराध्यक्ष, पण सत्ता दुसऱ्याच पक्षाची! नगर परिषदांचा खरा कारभारी को

  • थेट निवडलेले नगराध्यक्ष, पण सत्ता दुसऱ्याच पक्षाची! नगर परिषदांचा खरा कारभारी को

View All
advertisement