कळवणच्या आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण, जमावाकडून वाहनांची तोडफोड, पोलिसांवर दगडफेक
- Published by:Prachi Amale
- Reported by:Laxman Ghatol
Last Updated:
अचानक जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत पोलीस वाहनाच्या काचाही फुटल्याचे बघायला मिळालं आहे
नाशिक : कळवणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कळवण येथील आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यात आंदोलकांनी पोलीस स्थानकावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसा ठाण्याच्या बाहेर लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे.अचानक जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत पोलीस वाहनाच्या काचाही फुटल्याचे बघायला मिळालं आहे. सध्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
कळवण तालुक्यातील धाकटी गावातील आदिवासी शेतमजुराचे अपहरण करून खून केल्याचा आरोप प्रकरणात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन सुरू होतं. तक्रार दाखल करूनही योग्य ती दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांचा रोष उसळला. संतप्त जमावाने पोलिस ठाण्याच्या बाहेर घोषणाबाजी केली, त्यानंतर परिस्थिती चिघळली.
पोलिस स्थानकावर अचानक दगडफेक
पोलिस प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप करत पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं. दरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यामध्ये वाद झाला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पोलिस स्थानकावर अचानक दगडफेक सुरू झाली. जमावाने पोलिसांवर थेट दगडफेक करत ठाण्याच्या आवारातही घुसण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण अधिक तणावपूर्ण झाले. या हल्ल्यात काही पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
advertisement
लाठीचार्जनंतर परिस्थिती नियंत्रणात
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे आणखी गोंधळ उडाला. काही आंदोलकांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती आहे. लाठीचार्जनंतर परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी शहरात तणावपूर्ण शांतता आहे.घटनेनंतर पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा बोलावून ठाणे परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
October 04, 2025 2:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कळवणच्या आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण, जमावाकडून वाहनांची तोडफोड, पोलिसांवर दगडफेक