Pune News: महिला कंडक्टरच होणार ड्रायव्हर! PMP चा मोठा निर्णय, लवकरच महिलांच्या हाती स्टेअरिंग

Last Updated:

Pune News: पुणे महानगर परिवहन महामंडळात सध्या एकूण 220 महिला वाहक कार्यरत आहेत. यापैकी 212 महिला वाहक (कंडक्टर) कायमस्वरूपी असून, आठ महिला वाहक या बदली कामगार म्हणून कार्यरत आहेत.

पीएमपीमध्ये महिला बस कंडक्टर आता बनणार चालक! 
पीएमपीमध्ये महिला बस कंडक्टर आता बनणार चालक! 
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपी) कार्यरत महिला वाहकांना (कंडक्टर) आता चालक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी पीएमपी प्रशासनाने महिलांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अॅण्ड रिसर्च’ संस्थेच्या माध्यमातून एक महिन्याचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात स्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला महिला कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, 15 ते 20 महिला वाहकांनी चालक प्रशिक्षणासाठी तयारी दाखवली आहे. प्रशासनाकडून या महिलांना लवकरच प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना बसचालक म्हणून संधी दिली जाईल.
सध्या पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. संस्थेमध्ये सध्या 8 हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, नव्या कायमस्वरूपी पदभरतीला स्थगिती देण्यात आल्यामुळे, इच्छुक महिला वाहकांना चालक प्रशिक्षणाची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रशिक्षणादरम्यान महिला वाहकांना IDTRकडून परवाना (लायसन्स) काढून देण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच पुण्याच्या रस्त्यावर पीएमपीच्या बसच्या स्टेअरिंगवर महिला चालक दिसतील.
advertisement
पीएमपीत 220 महिला वाहक
पुणे महानगर परिवहन महामंडळात सध्या एकूण 220 महिला वाहक कार्यरत आहेत. यापैकी 212 महिला वाहक (कंडक्टर) कायमस्वरूपी असून, आठ महिला वाहक या बदली कामगार म्हणून कार्यरत आहेत. या सर्वांपैकी सुरुवातीला 15 ते 20 महिला वाहकांना चालक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
advertisement
सगळ्या क्षेत्रात महिला आज आघाडीवर आहेत. शिवाय महिलांना 33 टक्के आरक्षण असल्याने विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा सहभाग वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पीएमपीने इच्छुक महिला वाहकांना बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिलांना सुरुवातीला ‘पुण्यदशम’ बसवर चालक म्हणून नियुक्ती देण्याचा उद्देश आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 15 ते 20 महिला वाहकांनी चालक होण्यासाठी तयारी दर्शविली आहे, अशी माहिती पीएमपी अध्यक्ष पंकज देवरे यांनी दिली.
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: महिला कंडक्टरच होणार ड्रायव्हर! PMP चा मोठा निर्णय, लवकरच महिलांच्या हाती स्टेअरिंग
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement