Pune Crime: पुणेकरांची रात्रीची झोप उडाली! 'या' भागात रात्री घडलं भयकंर; पोलिस तपास सुरू
Last Updated:
Pune Crime News : पुण्यातील काही भागात अज्ञात गुंडांकडून रात्रीच्या अंधारात अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली.पोलीस तपास सुरू असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्याचा प्रकार समोर आलेला आहे. काशिवाडी आणि लोहियानगर भागात काही अज्ञात व्यक्तींनी गाड्यांना नुकसान पोहचवले. यामध्ये चारचाकी गाड्या तसेच टेम्पो आणि रिक्षांच्या काचाही फोड करण्यात आला. अंदाजे 5 ते 10 गाड्यांवर ही तोडफोड केली गेली आहे.
रस्त्यावर उभ्या केलेल्या गाड्यांची तोडफोड झाल्याचा प्रकार झालाय. स्थानिक रहिवाशांमध्ये या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी असे केले गेले असल्याचे दिसून येत आहे. गाड्यांची तोडफोड केल्यामुळे मालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झाले आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
पोलिसांनी घटनास्थळाचा आढाव घेऊन तपास सुरू केला आहे.परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरील नोंदी तपासल्या जात आहेत. घटनास्थळाहून पोलिसांनी फूटप्रिंट आणि इतर पुरावे गोळा केले आहेत.
advertisement
स्थानिक लोकांनी पोलिसांना घटनास्थळाची माहिती दिली आहे. पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. रस्त्यावर गाड्या उभ्या करताना योग्य जागा वापरण्याचे आवाहन केले आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, या प्रकारच्या घटनांमध्ये काही व्यक्ती दहशत पसरवण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी गाड्यांची तोडफोड करतात. पोलिस तपास करत असून लवकरच गुन्हेगार पकडले जाऊ शकतात असा विश्वास व्यक्त केला आहे.
advertisement
अशा प्रकारच्या घटनांमुळे परिसरात नागरिकांची सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. पोलिसांनी या भागात पथक तैनात केले असून रात्रीच्या वेळेस विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एकूणच काशिवाडी आणि लोहियानगर भागात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाली असून पोलिस तपास करत आहेत आणि नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2025 12:34 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पुणेकरांची रात्रीची झोप उडाली! 'या' भागात रात्री घडलं भयकंर; पोलिस तपास सुरू