राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, फळबागा आणि पिकांचं अतोनात नुकसान; बळीराजा हवालदिल

Last Updated:

राज्यात गेल्या दोन दिवसात परतीच्या पावसानं कहर केला आहे. या परतीच्या पावसाचा फळबागा आणि पिकांना मोठा फटका बसला आहे.

News18
News18
मुंबई : गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या संकटातून राज्याचा बळीराजा सावरू लागलेला असतानाच आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलं आहे. द्राक्षबांगासह कांदा आणि कापसाचं या पावसात अतोनात नुकसान झालंय. यामुळं राज्यातील बळीराजा हतबल झालाय. राज्यात गेल्या दोन दिवसात परतीच्या पावसानं कहर केला आहे. या परतीच्या पावसाचा फळबागा आणि पिकांना मोठा फटका बसलाय.
नाशिकच्या निफाडमधल्या द्राक्ष बागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. दोन दिवसा पासून होत असलेल्या पावसामुळे द्राक्ष बागायतदार पुन्हा संकटात सापडलेत.या पावसामुळं सुमारे 50 ते 60 टक्के पेक्षा जास्त द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या.सतत होत असलेल्या पावसामुळे द्राक्षे घडावर परिणाम झाला आहे अनेक ठिकाणी फुलोरा आणि फळ सडू लागल्यामुळे बागायतदार हतबल झाले आहे
advertisement
गेल्या महिन्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीतुन शेतकरी सावरलेला नसताना आता त्याच्यावर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट कोसळलंय. चांदवड,मनमाडसह नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे.निसर्गाने उरलीसूरली पिके देखील हातातून हिरावून घेतल्यामुळे बळीराजा अक्षरशः हतबल झाला आहे.
शिरूर तालुक्यात झालेल्या पावसामुळं शेतात तळं साचल्यासारख चित्र दिसून आलं.. यामुळं कांदा पिकांचं नुकसान झालं असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. पिकांचं मुळाजवळ पाणी साचल्यानं पीक कुजून जाण्याची शक्यता आहे.शहापूर आणि पालघर भागात पावसामुळे शेतात कापून ठेवलेली भात पिके पुन्हा एकदा पाण्याखाली गेली आहेत.पावसामुळे झाकून ठेवलेल्या भात पिकाला कोंब फुटू लागल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे...ऐन दिवाळी सणात हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
advertisement

शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठे नुकसान

गोंदिया जिल्ह्यात काल झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठे नुकसान झालं आहे. सध्या जिल्ह्यात धान कापणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली धान पिकं कापून शेतात वाळवण्यासाठी ठेवली होती.मात्र,परतीच्या पावसाने हे सर्व धान पीकं ओलं झालं. धान ओला झाल्यानं आता त्यातून अंकुर फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
advertisement

हिंगोली कापसाचं नुकसान

हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे वेचणीस आलेल्या कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं आहे...आधीच शेतकऱ्यांचे सोयाबीन हातचे गेलं.त्यात आता कापसावर शेतकऱ्यांची मदार होती परंतु हा कापूस देखील भिजून ओला झाला आहे.कापूस पिवळा पडून आता काळवंडायला सुरुवात झाली आहे.त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला

पुढील काही दिवस पावसाच्या सरी कोसळल्याचा अंदाज असल्यामुळं बळीराजाच्या चिंता आणखी वाढल्या आहेत .वारंवार येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून सरकारनं मदत करावी अशी मागणी केली जात आहे
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, फळबागा आणि पिकांचं अतोनात नुकसान; बळीराजा हवालदिल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement