Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनीच पैशांच्या बॅगा आणल्या, वैभव नाईकांकडून व्हिडीओ पोस्ट, मालवणातील वातावरण तापलं
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sindhudurg : मालवणात सोमवारी रात्री भाजप कार्यकर्त्यांना पैशांचे वाटप करताना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी पकडले. त्यानंतर भाजप विरुद्ध शिंदे गट हा वाद चांगलाच पेटला. आता, या वादात ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उडी घेतली आहे.
मालवण : स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये तापलेलं राजकारण आणखी चिघळलं आहे. मालवणात सोमवारी रात्री भाजप कार्यकर्त्यांना पैशांचे वाटप करताना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी पकडले. त्यानंतर भाजप विरुद्ध शिंदे गट हा वाद चांगलाच पेटला. आता, या वादात ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच पैशांच्या बॅगा आणल्याचा आरोप केला आहे. नाईक यांनी व्हिडीओही पोस्ट केला आहे.
माजी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व निलेश राणे यांच्यावर थेट पैशांच्या वाटपाचे गंभीर आरोप करत वातावरण ढवळून काढलं आहे.
वैभव नाईक यांनी सांगितले की, एकीकडे निलेश राणेंनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले परंतु निलेश राणे आणि शिंदे- शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही. परवा एकनाथ शिंदे मालवणात आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेरा पासून लपण्यासाठी धावत आहेत हे वरील व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे. हेच पैसे काल निलेश राणेंनी मालवण मधील मतदारांना वाटले असल्याचा आरोप नाईक यांनी केला.
advertisement
वैभव नाईक यांनी पुढे म्हटले की, राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे गटाकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला.
वैभव नाईक यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील ट्वीट करत सवाल उपस्थित केला आहे.
advertisement
शिंदे मालवणात आले
येताना बॅगेतून काय आणले?
मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर!
या आधी नाशिक मध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या
लोकशाही ची ऐशी की तैशी?
जय महाराष्ट्र!
@ECISVEEP
@Dev_Fadnavis pic.twitter.com/TKXOXrv7FS
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 2, 2025
advertisement
निलेश राणे यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या....
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराची वेळ संपल्यानंतर मालवणमध्ये झालेल्या पोलीस नाकाबंदीत देवगड भाजपचे तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या गाडीत मोठी रोख रक्कम आढळल्याने खळबळ उडाली. भाजप कार्यकर्त्याच्या कारमध्ये रोकड सापडल्याचे समजल्यानंतर निलेश राणे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. या घटनाक्रमामुळे मालवणात रात्रीच्या वेळी वातावरण चांगलेच तंग झाले होते.
view commentsLocation :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
December 02, 2025 9:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनीच पैशांच्या बॅगा आणल्या, वैभव नाईकांकडून व्हिडीओ पोस्ट, मालवणातील वातावरण तापलं


