महाराष्ट्राच्या या गावात का लागतो लॉकडाऊन? कोणी घराबाहेर पाऊलही ठेवत नाही

Last Updated:

जळगावमधील वरखेडे गावात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थ, जनावरे दहशतीत आहेत. शेतकरी थाळ्या वाजवून, फटाके फोडून जीव वाचवत आहेत.

News18
News18
सातशे आठशे लोकांची वस्ती आणि त्यात घाबरुन राहणारे लोक, इथे मोलमजुरी आणि शेतीवर लोक राहतात. जर जीव वाचला तर सगळं नाहीतर उद्याचा दिवसही उगवेल की नाही माहिती नाही या भीतीच्या छायेखाली रोज ते वावरत राहतात. जगण्यासाठी जेवढा संघर्ष त्यांना करावा लागतो तेवढाच संघर्ष त्यांना जीवंत राहण्यासाठी आपला जीव सुखरुप ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हे गाव दुसरं तिसरं नाही तर महाराष्ट्रातलंच आहे. इथे संध्याकाळ झाली की अक्षरश: लॉकडाऊन लागतो. परिसरात भीतीचं वातावरण निर्माण होतं.
संपूर्ण वस्तीत एकदम शांतता पसरते. काळोख आणि किड्यांचा किर्रर्र आवाज आणि दबक्या पावलांनी तो येण्याची भीती मनात घर करुन असते. दिवसा इथे शेतकरी आणि मजूर जीव वाचवण्यासाठी थाळ्यांचा आवाज करतात, फटाके फोडतात किंवा पत्र्याचे डबेही जोरात वाजवत राहतात. त्यामुळे त्यांचा जीव सुरक्षित आहे असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यांना पावला पावलावर भीती असते.
advertisement
इथे ग्रामस्थांनी पाळलेल्या बकऱ्या, कोंबड्याच काय अगदी गायी आणि वासरं देखील भयभीत आहेत. दहशतीखाली आहेत. ग्रामस्थांना तर वासरं बाईकवरुन फिरवण्याची वेळ आली आहे. ही दहशत आहे बिबट्याची. मागच्या काही दिवसांपासून बिबट्याचे हल्ले वाढत चालले आहेत. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. कधी घराबाहेर, शेतात तर कधी थेट घरात घुसून आता बिबट्या हल्ला करायला लागला आहे.
advertisement
शेतकरी वासरं आणि बकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना गाडीवरुन घेऊन ये जा करत आहेत अशी परिस्थिती आहे. हे गाव आहे जळगावमधील वरखेडे इथलं. या गावाचा एक भाग टेकडीवर वसलेला आहे. काही अंतरानंतर संपूर्ण जंगलच सुरू होतं. उंच कुंपण घातलं तर कुंपणाचे खांबच चोरून नेल्याचा प्रकार झाला. कुंपण नावालाच राहिलं आणि बिबट्यासाठी मेजवानी झाली. तिथे ग्रामस्थांनी सांगितलेल्या अनुभव फार भयंकर होता.
advertisement
दिव्य मराठीने दिलेल्या माहितीनुसार त्या गावात दिवस बिबट्या अक्षरश: झाडावर बसून असलेला देखील पाहिला आहे. दर दिवस शेतात काम करत असताना जीव वाचवण्यासाठी सतत थाळी वाजवत राहावी लागते. जेणेकरुन बिबट्या येऊ नये. एका शेतकऱ्याची वासरं या बिबट्याने पळवल्याचं दु:खं तच्याने व्यक्त केलं. आता तो आपली उरलेली वासरं गाडीवरुन घेऊन जात असल्याचं सांगितलं.
advertisement
बिबट्याच्या भीतीनं इथे शेतीच्या कामासाठी माणसं मिळत नाहीत. त्यामुळे घरातल्यांनाच शेतात जावं लागतं. शेतात बिबट्याच्या हल्ल्याची सारखी भीती असतेच. पण पोटाचा प्रश्न आहे त्यामुळे करावं लागतं. संध्याकाळी शेकोटी पेटवणे, फटाके फोडणे यासारख्या गोष्टी करुन लोक आपला जीव वाचवत आहेत. सध्या हे संपूर्ण गाव बिबट्याच्या दहशतीखाली आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रातील वाढणारे बिबट्याचे हल्ले हा एक चिंतेचा विषय होत चालला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्राच्या या गावात का लागतो लॉकडाऊन? कोणी घराबाहेर पाऊलही ठेवत नाही
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement