Anil Kumar Pawar : दादा भुसेंच्या जावयाला 20 ऑगस्टपर्यंत ED कोठडी, कोर्टात नेमकं काय काय घडलं? वाचा A टू Z स्टोरी
- Published by:Prashant Gomane
- Written by:प्रशांत लीला रामदास
Last Updated:
वसई विरारमध्ये डंपिग ग्राऊंडसाठी राखीव असलेल्या जागेवर 41 अनधिकृत बांधकाम उभारल्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी आयुक्त अनिल कुमार यांना पीएमएलए कोर्टाने 20 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
Vasai Virar News IAS Anil kumar Pawar ED Custody : वसई विरारमध्ये डंपिग ग्राऊंडसाठी राखीव असलेल्या जागेवर 41 अनधिकृत बांधकाम उभारल्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी आयुक्त अनिल कुमार यांना पीएमएलए कोर्टाने 20 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. पवार यांच्यासोबत नगररचना उपसंचालक (निलंबित) वाय एस रेड्डी आणि नगरसेवक आणि बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता तसेच बांधकाम व्यावसायिक अरुण गुप्ता यांना देखील तितकीच सहा दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान कोर्टाच्या सुनावणीत काय काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.
माजी आयुक्त अनिल पवार यांच्यासह तिघांना आज पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टात पार पडलेल्या सुनावणीत अनिलकुमार पवार यांच्या वकिलांनी पवार हे शिंदेसेनेचे मंत्री दादा भुसे यांचे नातेवाईक असून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत असलेल्या अतंर्गत वादातून ही कारवाई केल्याचा दावा कोर्टात केला होता.
तर ईडीने कोर्टात वसई-विरारमधील 41 अनधिकृत इमारतींच्या बांधकामातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक अनिल कुमार पवार यांना अटक केल्याची माहिती दिली.त्याचसोबत आरोपींच्या मालमत्तांवर टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधींच घबाड जप्त केल्याची माहिती कोर्टाला दिली. आणि या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी ईडीने चारही आरोपींसाठी दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.
advertisement
अखेर कोर्टातीला या युक्तीवादानंतर वसई विरार महापालिका माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना 20 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. अनिल कुमार पवार यांच्यासह नगररचना उपसंचालक (निलंबित) वाय एस रेड्डी आणि नगरसेवक आणि बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता तसेच बांधकाम व्यावसायिक अरुण गुप्ता यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
छापेमारीत ईडीच्या हाती काय काय लागलं?
advertisement
वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर 41 अनधिकृत इमारती प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत त्यांना बुधवारी रात्री ईडीने अटक केली होती. पवार यांच्यासह ईडीने नगररचनाकार वाय एस रेड्डी,सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांनाही अटक केली होती.
अनिल कुमार पवार यांच्यावर वसई विरार परिसरात मलनिस्सारण आणि डंपिंग ग्राउंडसाठी राखीव 60 एकर भूखंडावर बांधण्यात आल्या होत्या 41 अनधिकृत इमारतीत मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीताराम गुप्ता यांच्यावर सूत्रधार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आणि अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने करोडोंचा भ्रष्टाचार केल्याची माहिती आहे.
advertisement
या प्रकरणातील यापूर्वीच्या छाप्यात 8 कोटी 94 लाख रोख,23 कोटी 25 लाखाचे हिरे,13 कोटी 86 लाखाचे शेअर्स अणि गुंतवणूक,ED ने केल्या आहेत जप्ततर 29 जुलैला अनिल पवार यांच्या नाशिक येथील पुतण्या जनार्दन पवारचा घरी 1 कोटी 33 लाखाची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणात सनदी लेखापाल,वास्तुविशारद,कनिष्ठ अभियंते,ठेकेदार, बडे अधिकारी आणि अनेक एजंट आहेत ED च्या रडारवर आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2025 5:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Anil Kumar Pawar : दादा भुसेंच्या जावयाला 20 ऑगस्टपर्यंत ED कोठडी, कोर्टात नेमकं काय काय घडलं? वाचा A टू Z स्टोरी


