advertisement

नवव्या महिन्यात पोहायला शिकली, दीड वर्षीय वेदा सरफरेच्या नावावर विश्वविक्रम, 100 मीटर पोहून रेकॉर्ड मोडला

Last Updated:

वेदा परेश सरफरे हिने १०० मीटर जलतरण १० मिनिटे ८ सेकंदात पूर्ण करून इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवले, हिंदुस्थानातील सर्वात लहान जलतरणपटू बनली.

News18
News18
राजेश जाधव, प्रतिनिधी रत्नागिरी: 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात', ही म्हण रत्नागिरीच्या वेदा परेश सरफरे हिच्या बाबतीत थोडी बदलावी लागेल. कारण तिचे पाय थेट नव्या महिन्यातच पाण्यात दिसू लागले, तेही पोहताना! नऊ महिन्यांची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला सुरुवात करणारी वेदा, अवघ्या १ वर्ष ९ महिन्यांची असताना इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्सपर्यंत पोहोचली आहे. तिने १०० मीटरचे अंतर केवळ १० मिनिटे आणि ८ सेकंदांत पूर्ण करत, हिंदुस्थानातील सर्वात लहान जलतरणपटू बनण्याचा विक्रम केला आहे.
रडण्याच्या वयात पाण्याशी केली दोस्ती
नऊ महिन्यांची ही चिमुरडी, खरेतर तिचे ते रडण्याचे आणि आईच्या कुशीत सुरक्षित राहण्याचे वय; पण या वयात ती रडणे विसरून पोहणे शिकत होती. वेदाचा मोठा भाऊ रुद्र शासकीय जलतरण तलावात दररोज सराव करतो आणि तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झालेला आहे. रुद्रला घेऊन त्याची आई पायल सरफरे जेव्हा तलावावर येत असे, तेव्हा कंबरेवर बसून वेदा जलतरण तलावातील लोकांचे पोहणे कुतूहलाने पाहत असे.
advertisement
प्रशिक्षकांनी ओळखले हिचे कौशल्य
वेदाची पाण्याची ही आवड प्रशिक्षक महेश मिलके यांच्या लक्षात आली. त्यांनी एका दिवशी वेदाला पाण्यात सोडले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती रडली नाही, उलट पाण्यावर हातपाय मारून तिने पाण्याशी थेट दोस्तीच केली. हळूहळू ती पोहायला लागली. आज जलतरण तलावाच्या कठड्यावरून पाण्यात डोकावताना किंवा पाण्यात उतरताना तिचा अफाट आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येतो. तिच्या या विक्रमी प्रवासाने तिची इच्छाशक्ती आणि आई-वडिलांचे समर्पण सिद्ध होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नवव्या महिन्यात पोहायला शिकली, दीड वर्षीय वेदा सरफरेच्या नावावर विश्वविक्रम, 100 मीटर पोहून रेकॉर्ड मोडला
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement