Maharashtra Election Results : जिथे 'व्होट जिहाद' म्हणाले तिथेच भाजपचा डंका, मुस्लिम बहुल भागात महायुतीची मुसंडी!

Last Updated:

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. 288 जागांपैकी फक्त 50 जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर आहे, तर 233 मतदारसंघामध्ये महायुती आघाडीवर आहे.

जिथे 'व्होट जिहाद' म्हणाले तिथेच भाजपचा डंका, मुस्लिम बहुल भागात महायुतीची मुसंडी!
जिथे 'व्होट जिहाद' म्हणाले तिथेच भाजपचा डंका, मुस्लिम बहुल भागात महायुतीची मुसंडी!
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. 288 जागांपैकी फक्त 50 जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर आहे, तर 233 मतदारसंघामध्ये महायुती आघाडीवर आहे. निवडणुकीच्या निकालांमध्ये एकटी भाजपच 145 च्या बहुमताजवळ पोहोचली आहे. भाजप 133 जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना 57 जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागांवर आघाडीवर आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेना 20 जागांवर, काँग्रेस 15 जागांवर आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय समाजवादी पार्टी 2 जागांवर आणि इतर छोटे पक्ष तसंच अपक्ष 10 जागांवर आघाडीवर आहेत.
मुस्लिम बहुल भागातही महायुती वरचढ
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपकडून व्होट जिहादचा आरोप करण्यात आला. मुस्लिम बहुल भागात महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतं मिळाली होती, त्यामुळे भाजपने महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली होती. पण आता मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्येही महायुतीला मोठ्याप्रमाणावर यश मिळालं आहे. महाराष्ट्रात ज्या विधानसभा जागांवर 20 टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत, तिथल्या 23 जागांवर महायुतीचा तर 14 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे आणि एका जागेवर इतर पक्षाचा आमदार निवडून आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election Results : जिथे 'व्होट जिहाद' म्हणाले तिथेच भाजपचा डंका, मुस्लिम बहुल भागात महायुतीची मुसंडी!
Next Article
advertisement
BMC Election : BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं? Inside Story
BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं?
  • BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं?

  • BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं?

  • BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं?

View All
advertisement