Maharashtra Elections Result : महाराष्ट्रातला पहिला पुतण्या पडला, युगेंद्र पवारही पराभवाच्या छायेत!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. दुपारी 12.30 वाजेपर्यंत 221 जागांवर महायुती तर फक्त 56 जागांवर महाविकास आघाडी पुढे आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. दुपारी 12.30 वाजेपर्यंत 221 जागांवर महायुती तर फक्त 56 जागांवर महाविकास आघाडी पुढे आहे. विधानसभा निवडणुकीतला सगळ्यात धक्कादायक निकाल कोल्हापुरातून आला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपच्या अमल महाडिक यांनी ऋतुराज पाटलांना धोबीपछाड दिली आहे.
एकीकडे ऋतुराज पाटील या पुतण्याचा पराभव झालेला असतानाच बारामतीमध्ये आणखी एक पुतण्या पराभवाच्या छायेत आहे. अजित पवारांविरोधात पुतण्या युगेंद्र पवार 38 हजार मतांनी पिछाडीवर आहे. तर माहिममधून उद्धव ठाकरेंचे पुतणे आणि राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरेही पराभवाच्या छायेत आहेत. माहिमच्या तिरंगी लढतीमध्ये अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.
महायुतीची त्सुनामी
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीची त्सुनामी आली आहे. महाराष्ट्रात भाजपने लागोपाठ तिसऱ्यांदा तीन आकडी संख्या गाठली आहे. 124 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर शिवसेना 55 जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे 20 जागांवर, काँग्रेस 19 जागांवर आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 13 जागांवर आघाडीवर आहे. तर 20 जागांवर इतर पक्ष आणि अपक्ष आघाडीवर आहेत.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
November 23, 2024 12:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Result : महाराष्ट्रातला पहिला पुतण्या पडला, युगेंद्र पवारही पराभवाच्या छायेत!


