Video : विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकुरांची पत्रकार परिषद सुरू असताना अचानक पोलिसांची एंट्री
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बहुजन विकास आघाडीच्या हॉटेलमधील राड्यानंतर हितेंद्र ठाकुर आणि विनोद तावडे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत ठाकुर म्हणाले की, तावडे साहेब माझे मित्र आहेत, क्षितीज त्यांना काका बोलतो, असे ठाकुर सूरूवातीला म्हणाले.
विरार : विरारच्या विवांता हॉटेलमधील बहुजन विकास आघाडीच्या राड्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद सूरू असतानाच घटनास्थळी पोलिसांची एन्ट्री झाली होती. विनोद तावडेंना ताब्यात घेण्यासाठी पोलीस दाखल झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. तसेच या प्रकरणात आता गुन्हा विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सूरू आहे.
बहुजन विकास आघाडीच्या हॉटेलमधील राड्यानंतर हितेंद्र ठाकुर आणि विनोद तावडे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत ठाकुर म्हणाले की, तावडे साहेब माझे मित्र आहेत, क्षितीज त्यांना काका बोलतो, असे ठाकुर सूरूवातीला म्हणाले. तावडे साहेब तुम्ही थोडक्यात सांगायला पाहिजे होतं,सर्व्हेमध्ये नालासोपोराची ही सीट झिरो आहे, त्यामुळे कोणीच नेते आले नाही, त्यामुळे तुम्हाला बोलावून घेतले. तसेच या हॉटेलच्या रूममध्ये 10 लाख रूपये सापडले आहेत. मग हे पैसे कोणाचे आहेत? असा सवाल हितेंद्र ठाकुरांनी उपस्थित केला आहे. या दरम्यान क्षितीज ठाकूर आकडे डिक्लेअर करायची धमकी देताना दिसला.
advertisement
विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर पत्रकार परिषद घेण्यासाठी आले पण पोलिसांची झाली एंट्री pic.twitter.com/NofUQImwvw
— News18Lokmat (@News18lokmat) November 19, 2024
ठाकुरांनंतर विनोद तावडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. निवडणुक आचारसंहितेबाबत काय काय काळजी घ्यावी याविषयी मी माहिती दिलेली आहे. वास्तव आम्ही सांगितलं आहे आणि ठाकुरांनी आपली बाजू सांगितली आहे,असे म्हणत विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया आटोपती घेतली.
advertisement
दरम्यान या पत्रकार परिषदेच्या मधोमधच पोलिसांची एंट्री झाली होती. पोलीस तावडेंना ताब्यात घेण्यासाठी घटनास्थळी आल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणात आता विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहे.
view commentsLocation :
Vasai-Virar City,Thane,Maharashtra
First Published :
November 19, 2024 4:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Video : विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकुरांची पत्रकार परिषद सुरू असताना अचानक पोलिसांची एंट्री


