मतदानादिवशी १५ तारखेला कुणाकुणाला भरपगारी सुट्टी? राज्य शासनाकडून आदेश जारी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात म्हटले आहे.
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शासकीय कार्यालयांसहित शैक्षणिक, औद्योगिक आणि वाणिज्यिक आस्थापनांना गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने अधिसूचना तसेच शासन परिपत्रक नुकतेच निर्गमित केले आहे. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात म्हटले आहे.
आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १३५ (बी) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, काही संस्था/आस्थापना इ. त्यांच्या कामगारांना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
advertisement
राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे दि.१५/०१/२०२६ रोजी राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. सदर निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यामधील सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत:
I) निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
advertisement
II) सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीना लागू राहिल (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी, हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)
III) अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थपनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल.
advertisement
IV) वर नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीच्या मालकांनी/ व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल.
advertisement
३. सदर परिपत्रक राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचे यांचे क्र. रानिआ/मनपा २०२५/प्र.क्र.८०/का.५. दि.२६/१२/२०२५ रोजीच्या पत्रास अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 9:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मतदानादिवशी १५ तारखेला कुणाकुणाला भरपगारी सुट्टी? राज्य शासनाकडून आदेश जारी











