बैलपोळ्याची तयारी अंतिम टप्प्यात, पाहा कशी बनतेय सर्जा-राजाची जोडी?

Last Updated:

महाराष्ट्रात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाला पूजण्यासाठी मातीचे बैल बनवले जातात.

+
बैलपोळ्याची

बैलपोळ्याची तयारी अंतिम टप्प्यात, पाहा कशी बनतेय सर्जा-राजाची जोडी?

वर्धा, 4 सप्टेंबर: विदर्भात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पोळ्याच्या सणाला मातीच्या बैलांची पूजा केली जाते. त्यामुळे वेगवेगळ्या रंगांच्या बैल जोडी मूर्तिकारांनी बनवल्या आहेत. काही दिवसांपासूनच मूर्तिकारांकडे मातीचे बैल बनवण्यासाठीची लगबग सुरू झाली असून मातीच्या बैलांना रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मातीचे हे आकर्षक बैल कसे बनवतात ? एक बैल जोडी तयार होण्यासाठी किती वेळ लागतो? वाढत्या महागाईनुसार या बैलांची किंमत काय? याबाबत वर्धा येथील मूर्तिकारांनी माहिती दिली आहे.
कोरोना काळानंतर पुन्हा चालना
कोरोना काळात सण उत्सव साजरे करण्यास निर्बंध होते. लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या ग्रामीण भागातील पारंपरिक व्यवसायाला आता पुन्हा चालना मिळाली आहे.आकर्षक मूर्ती विक्री करून मागच्या वर्षीपासून मूर्तिकार देखील चांगली मिळकत मिळवत आहेत. त्यामुळे मूर्तिकारांवर आनंदाचे दिवस आलेले दिसत आहे.
advertisement
बैलजोडीची होते मनोभावे पूजा
पोळा हा कृषी संस्कृतीशी संबंधित सण आहे. या सणाला बैलांची पूजा केली जाते. त्यामुले ज्यांच्या घरी बैल नाहीत ते मातीच्या मूर्तींची पूजा करतात. त्यांना गोड-धोड नैवद्यही दाखवतात. सध्या सर्वत्र यांत्रिकीकरणामुळे पशुधन कमी झालेलं दिसतंय. त्यामुळे गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत शेतकरी मातीच्या बैलांची पूजा करतात. त्यामुळे आता मूर्तिकारांकडे असलेल्या आकर्षक बैलजोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
advertisement
अशी बनते नंदीची मूर्ती
पोळा सणाच्या जवळजवळ दोन महिन्यांपूर्वी मातीचे बैल बनविण्यास प्रारंभ होतो. आधी माती विकत आणून मातीचा चिखल केला जातो. ती भिजवलेली माती साच्यात भरली जाते किंवा साध्या विना रंगांच्या बैल जोडी साठी हाताने आकार दिला जातो. साच्यातून काढून तयार केलेले बैल उन्हात वाळवले जातात. त्या बैलाना आकर्षक रंग दिला जातो. डोळे कोरले जातात. अशाप्रकारे आकर्षक बैलजोडी विक्रीसाठी तयार होते.
advertisement
बैलजोडीची किंमत किती?
सध्याच्या काळात महागाई वाढली आहे. मातीचे दर वाढले असून मजुरीही वाढली आहे. त्यामुळे एक बैलजोडी 70 ते 80 रुपयांना विकली जात आहे. तसेच रंग आणि आकार यावरूनही बैलजोडीचे दर ठरतात, असे मूर्तिकार सांगतात.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
बैलपोळ्याची तयारी अंतिम टप्प्यात, पाहा कशी बनतेय सर्जा-राजाची जोडी?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement